AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde: ‘…तर मी बीडमध्येही रॅम्प वॉक करेन’, रॅम्प वॉक वादावरुन पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर!

विरोधक टिका करत असतील तर दुर्दैवी आहे. बीडने जर साडी दिली तर मी बीडमध्येही साडी घालून रॅम्प वॉक करेल," अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.

Pankaja Munde: '...तर मी बीडमध्येही रॅम्प वॉक करेन', रॅम्प वॉक वादावरुन पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर!
Pankaja Munde Image Credit source: Twitter| Pankaja Munde
| Updated on: Nov 05, 2026 | 6:12 PM
Share

Pankaja munde On Ramp Walk Controversy:  भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, मंत्री पंकजा मुंडे सध्या त्यांनी केलेल्या रॅम्पवॉकवरुन विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.मुंबईमध्ये गँड हयात येथे सुरु असलेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये त्यांनी रॅम्प वॉक केला ज्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना मंत्री रॅम्पवॉक करण्यात व्यस्त आहेत अशी टिका त्यांच्यावर होत आहे. विरोधकांच्या या टिकेला आता स्वतः पंकजा मुंडे यांनी उत्तर देत रॅम्पवॉक का केला? याचे कारण स्पष्ट केले आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“काही दिवसांपूर्वी जालनाई या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले होते.तिथे अतिशय सुंदर वस्त्रे बनवून ती बाहेर विकली जातात. त्याच्या ब्रँडसाठी मी रॅम्प वॉक केला होता. तो वॉक फॉर कॉज होता, त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केला होता. यावरुन विरोधक टिका करत असतील तर दुर्दैवी आहे. बीडने जर साडी दिली तर मी बीडमध्येही साडी घालून रॅम्प वॉक करेल,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला. तसेच रेशीन उद्योगाच्या दृष्टीने मी जालन्यासोबतच बीडमध्येही प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी!

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरही भाष्य केले.”बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळाच्या अनुषंगाने मी आल्यावर बैठक घेतली आहे. प्रामुख्याने चारा आणि पाण्याच्या अनुषंगाने ही बैठक होती. आज दुष्काळ हा सर्वांवर आला आहे, त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मागच्या वर्षीही टँकरची गरज पडू नये यासाठी उपाय केले होते,यंदाही हाच प्रयत्न असणार आहे, असंही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.

दरम्यान, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पंकजा मुंडे यांनी आज  दुष्काळी परिस्थितीचा आढावा  घेतला. यावेळी त्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सजग आणि सतर्क राहून काम करावे असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, निवासी उप जिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी तसेच कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, जलसंधारण आदी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Follow Us
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा