मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर…

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर...
CM EKNATH SHINDE AND NCP LEADER AJIT PAWAR
| Updated on: Mar 25, 2023 | 7:31 PM

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, विरोधकांच्या अनुपस्थितच सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. विधासनभेच्या इतिहासात विक्रमी कामकाज झाले. वेगवेगळ्या विषयावर पहिल्यादाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. नवीन सदस्यांना संधी दिली. राहुल गांधी यांचा विषय खरे तर दोन दिवसांपूर्वीच होता. पण, वरिष्ठांकडून आदेश आला तो पाळावा लागतो. तसे काहीसे आज झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि विविध घटक यांच्याबद्दल चांगले निर्णय झाले. विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प मांडला. मोदी आवास योजना, शबरी योजना आणि नव्या योजना यामधून समाजाला भर देण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी निर्णय घेतले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण, ही ‘अंदर की बात है.’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

गेली तीन वर्ष दोन अधिवेशन चार दिवसांचे व्हायचे. पण, या अधिवेशनात १७ विधेयके संमत झाली. अर्थसंकल्प मांडला. पंचामृत असा अर्थसंकल्प होता. छोट्या घटकासाठी महामंडळे केली. शेतकऱ्यांना नियमाबाहेर जाऊन नुकसान भरपाई दिली. आताही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकांसाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला. विरोधकांची स्वागत केले आहे. पण, ते कसे बोलतील. अधिवेशनादरम्यान अनेक अडचणी आणल्या. सरकारी कर्मचारी संप झाला. लॉन्ग मार्च आला. पण, सरकारने त्यावर योग्य मार्ग काढला. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत दिले. पण, ते थोडे थोडे द्यायचे असते. लोटा भरून दिले तर… असे म्हणत मुख्यमंत्री विरोधकांना चांगलाच टोला लगावला.

डोळा मारायचा हा तर नवा सुप्त गुण

या अधिवेशनात विरिधि पक्षनेते अजित पवार यांचा डोळा मारायचा हा नवा सुप्त गुण आपल्याला दिसून आला. आम्ही आधी एकत्र सरकारमध्ये असताना त्यांचा हा गुण कधी दिसून आला नाही, अशी मिश्किली मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.