50 ग्रॅम पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू समोर; त्यादिवशी कारमध्ये नेमकं काय घडल? CJP आंदोलकाने सगळं सांगितलं

मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला तरुण आंदोलकांना धमकी देणं महागात पडलं. त्यानंतर या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. आता या पोलिसाची दुसरी बाजू समोर आली आहे.

50 ग्रॅम पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू समोर; त्यादिवशी कारमध्ये नेमकं काय घडल? CJP आंदोलकाने सगळं सांगितलं
| Updated on: Jul 25, 2026 | 12:09 PM

नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यानंतर आंदोलकांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाची पोलखोल केली होती. आंदोलकांनी पोलिसाचा धमकी देतानाचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला होता. या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पोलीस प्रशासनाकडून जोरदार टीका झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या पोलीसावर निलंबनाची कारवाई झाली. आता या पोलिसाची दुसरी बाजू समोर आली आहे. आंदोलक विद्यार्थ्यानेच या पोलिसाची चांगली बाजू सांगितली आहे.

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन देशभर पसरलं आहे. महाराष्ट्रातही विद्यार्थी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तरुण रस्त्यावर उतरून नीट पेपरफुटीचा निषेध करत आहेत. मुंबईतील ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कातही मागील अनेक दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला शेकडोंच्या संख्येत तरुण आंदोलनात सामील होत आहेत. दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या कारवाईचा देखील सामना करावा लागत आहे. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन रोखलं जात आहे. काही दिवसांपूर्वी नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी एक पोलीस कर्मचाऱ्याने 50 ग्रॅम पावडर खिशात टाकून कारवाई करतो, अशी धमकी दिली होती. आता या पोलिसाच्या कारमध्ये बसलेल्या तीन तरुणांपैकी एका तरुणाने व्हिडिओची दुसरी बाजू सांगितली आहे.

 


‘त्या पोलिसाला अधिक वेळासाठी निलंबित करू नका’

कारमधील एका तरुणाने सांगितले की,’सबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अधिक वेळासाठी निलंबित करू नका. ते पोलीस काका इतकेही वाईट नव्हते. आम्हाला कारमध्ये गरम झालं, त्यावेळी पोलीस काकांनी एसी लावला. आम्हाला कारमध्ये गाणी ऐकण्याचं स्वातंत्र्य दिलं. गणपतीच्या काळात मुंबई पोलिसांची मोठी मदत होते. त्यामुळे त्यांच्यावर जास्त वेळ कारवाई करू नका, असे मत या तरुणाने मांडले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us