AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC 12th Result 2026 Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर

Maharashtra Board HSC 12th Result 2026 Date and Time News Updates : साधारण मे महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून बारावीच्या परीक्षाच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra HSC 12th Result 2026 Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर
hsc result date declared
| Edited By: | Updated on: May 01, 2026 | 2:24 PM
Share

HSC Result 2026:  बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता सर्वात आधी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल येत्या शनिवार २ मे रोजी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कुठे पाहायचे याची वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी ) लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. बारावीच्या निकालाबद्दल चर्चा सुरू असतानाच आता बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल २ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.  यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या परीक्षांसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यंदाचा दहावी आणि बारावीच्या निकालांकडे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे दरवर्षी प्रमाणे लक्ष लागून राहिले होते.  दहावी आणि बारावीचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांच लक्ष असतानाच आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल येत्या २ मे रोजी जाहीर होणार आहेत. सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात हे निकाल जाहीर करण्यात येतील. दुपारी १ वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहेत. mahahsscboard.in या संकेतस्थळावर बारावीचे निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच  mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत.

10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात 12 वीची तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा पार पडली. दोन्ही परीक्षा संपून महिन्याभराचा कालावधी उलटला असून आता परीक्षांचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता असतानाच आता बारावीच्या निकालाची तारीख समोर आली आहे.

कुठे चेक करता येईल निकाल ? 

खालील लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल चेक करता येऊ शकतात :

https://mahresult.nic.in

https://hscresult.mkcl.org

https://hscresult.mahahsscboard.in

Maharashtra Board HSC Result 2026 : उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार, असा पाहा निकाल!

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट