उद्धव ठाकरेंसोबत काम करून अनुभव वाढला, CM फडणवीसांच्या वक्तव्याने सस्पेन्स निर्माण, काहीतरी घडणार?

उद्धव ठाकरेंसोबत काम करून अनुभव वाढला, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केल्याने सस्पेन्स निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर काहीतरी घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंसोबत काम करून अनुभव वाढला, CM फडणवीसांच्या वक्तव्याने सस्पेन्स निर्माण, काहीतरी घडणार?
uddhav thackeay and devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 1:55 PM

ऐन दिवाळीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. चक्क शिंदे गटाचे नेते, मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन नेत्यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठं भाष्य केलं. उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी जुन्या शिवसेनेबाबत केलेल्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.  मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सस्पेन्स निर्माण झाल्याने काहीतरी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाच्या विधानावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदे आणि ठाकरेंसोबत काम करण्याचा अनुभव काय सांगतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचा मला चांगला आणि मोठा अनुभव आला.  2014 ते 2019 साली सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. तेव्हा दुष्काळ आणि अनेक गोष्टी होत्या. आता सुद्धा अनेक समस्या येता. मला याची सवय आहे.  उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याने अनुभव वाढला’. आता देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला की कौतुक समजावे, यावरून चर्चा सुरू झाली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या  वक्तव्याने सस्पेन्स निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर भाष्य केलं. सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या कामामध्ये फरक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

Loading...

गोकुळ अध्यक्ष निवडीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. गोकुळ संदर्भात आधीही सांगितलं आहे की, यात एक प्रकारे वैधानिक पेच निर्माण झालाय. एका गटाचे 13 तर दुसऱ्याचे 12 झाले. कोरम पूर्ण होत नव्हता, एकाच्या भरवशावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. सरकारला वाटलं असतं तर, निवडणुकीनंतर लगेच संचालक टाकले असते. डीडीआर पण असतो, मात्र कोरमसाठी बहुमत नाही, हे लक्षात आल्यावर निर्णय झाला आहे. उच्च न्यायालयात काल अध्यादेशात चूक नाही, असं सांगितलं. चार जणांची मतं वेगळी ठेवा आणि निवडणूक पूर्ण करा असं सांगितलं. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी एकत्र येत निर्णय केला असता तर संचालक पाठवले नसते. मात्र राजकीय रंग दिला गेला, राहुल गांधी देखील त्यात उतरले. मी संस्थेच्या पाठीशी आहे. सहकाराच्या क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना गोकुळमध्ये नेमले आहेत. एक गायनॅकोलाॅजिस्ट असेल तर त्यात चूक काय. आता देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर लक्ष घालावे लागत आहे, तर गायनॅकोलाॅजिस्ट तर साधा माणूस आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us