PM मोदींच्या मिमिक्रीवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींना सणसणीत टोला, एकाच वाक्यात केला जिव्हारी लागणारा वार

PM मोदींच्या मिमिक्रीवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींना सणसणीत टोला लगावला आहे. फडणवीसांनी एकाच वाक्यात राहुल गांधींवर जिव्हारी लागणार वार केला आहे.

PM मोदींच्या मिमिक्रीवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींना सणसणीत टोला, एकाच वाक्यात केला जिव्हारी लागणारा वार
devendra fanavis on rahul gandhi
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 1:45 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील ‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमात एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री केली. या मिमिक्रीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशभरातील दिग्गज नेत्यांनी मोदींच्या मिमिक्रीवरुन राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. मध्यप्रदेशातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत मातोश्रीचा अपमान केल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.

नागपुरात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर फडणवीस म्हणाले, ‘सोलर मॉड्युल तयार करणारी फॅक्टरी तयार करण्यात आली आहे. इतकं अॅडव्हान्स इंटिग्रेशन आज देशात कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्युल या फॅक्टरीमध्ये तयार होत आहे. या माध्यमातून एक प्रकारे सोलरच्या क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतून होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2024 साली भूमीपूजन झालं. त्यानंतर पाहू शकतो की, 5 हजार कामगार काम करत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे. या फॅक्टरीतील सोलर मॉड्युलला महत्व आहे.

‘बदलणाऱ्या महाराष्ट्र, विदर्भ , नागपूरच्या इको स्टिस्टिमचं हे उदाहरण आता ही फॅक्टरी आहे. याचा आणखी विस्तार केला जात आहे. मला वाटतंय की, अतिशय चांगलं काम झालं आहे. चार आणखी लोक गुंतवणूक करत आहे. बुटीबोरीमध्ये अतिरिक्त जागा नाही. गुंतवणूकांनी जागा घेतल्या आहेत. सगळीकडे काम सुरू आहे. आम्ही आता अतिरिक्त बुटीबोरी तयार करत आहोत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनीची मागणी आहे. एक हजार एकर जागा ही महिंद्राला दिली. त्यांचंही काम पुढील 2-3 महिन्यात सुरू करण्याचा मानस आहे. आता एक प्रकारे प्रतिक्षा यादी आहे. सावनेरमध्ये 5 हजार एकर जागा अधिगृहीत करत आहे. तिथेही मागणीची नोंद झाली आहे. या ठिकाणी चांगले जॉब निर्माण होत आहे’,असे त्यांनी सांगितले.  राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘मला असं वाटत आहे की, त्यांना आता हेच काम उरलं आहे. त्यांनी आता पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियनचं काम करावं. त्यांनी ते केल्यास त्यांना चांगला रोजगार मिळेल. इथे तर त्यांच्या पक्षाला बेरोजगार करून ठेवलं आहे’.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us