VIDEO : मनसेच्या आमदाराला सेनेत घ्या, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना शिफारस

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, शरद सोनवणे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात यावा यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वत: आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे. शरद सोनवणे हे चांगले […]

VIDEO : मनसेच्या आमदाराला सेनेत घ्या, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना शिफारस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, शरद सोनवणे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात यावा यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वत: आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.

शरद सोनवणे हे चांगले काम करणारे आमदार आहेत, ते त्यांचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत, त्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाकल्याचं सोनवणे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी सोनवणे यांना शब्द दिला असून सोमवारी 11 मार्चला दुपारी दोन वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  मुंबईतील शिवसेना भवनात सोनवणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.

शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. त्यामुळे हा मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कालच म्हणजे 9 मार्च रोजीच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. मात्र, मनसेच्या वर्धापन दिनाला शरद सोनावणे गैरहजर होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले होते. 2014 साली मनसेचे एकमेव आमदार ठरण्याचा मानही त्यांना मिळाला होता. तीन दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन शरद सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली होती.

कोण आहेत शरद सोनवणे?

  • शरद सोनवणे हे मनसेचे विद्यमान आमदार आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्त्व करतात.
  • मनसेत प्रवेश करण्याआधी ते शिवसेनेत सक्रीय होते.
  • शिवसेनेने 2014 साली त्यांना विधानसभेची तिकीट नाकारल्याने मनसेत प्रवेश करुन निवडणूक लढवली.
  • 2014 साली विधानसभा निवडणूक जिंकलेले सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.