मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कौकण दौरा पूर्ण, शेती, वीज, मस्त्य व्यवसायासह कोव्हिड स्थितीचा आढावा, कोणाचे किती नुकसान?

| Updated on: May 21, 2021 | 1:34 PM

पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले. (CM Uddhav Thackeray Konkan Tour)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कौकण दौरा पूर्ण, शेती, वीज, मस्त्य व्यवसायासह कोव्हिड स्थितीचा आढावा, कोणाचे किती नुकसान?
CM Uddhav thackeray konkan visit
Follow us on

रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले? याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले. अनेक जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. (CM Uddhav Thackeray Konkan Tour Tauktae Cyclone Affected District Visit)

तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील 5 तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पाहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली.

जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

?कोव्हीड आढावा

या वेळी जिल्हयातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्हयात सुरु असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.

?मोठया प्रमाणावर नुकसान

जिल्हयात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे.

जिल्हयात 17 घरे पूर्णत: बाधित झाली आहे. तसेच अंशत: बाधित घरांची संख्या 6766 आहे. यात सर्वाधित दापोलीत 2235 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1084 तर राजपूरातील 891 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील 370 इतकी आहे.

वादळात वाऱ्यामुळे 1042 झाले पडली. यात सर्वाधित 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे. चक्रीवादळात 59 दुकाने आणि टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर आहेत.

?शेती

चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर इतके नुकसान झाले. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

?वीज

चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे.

बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

?मत्स्य व्यवसाय

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले. 71 जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 90 लाख रुपयांपर्यंत आहे.

या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

?ई-उद्घाटन

जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.याचे ई-उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत योवळी माहिती दिली. तसेच त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

?साधेपणाने बैठक

बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली. (CM Uddhav Thackeray Konkan Tour Tauktae Cyclone Affected District Visit)

संबंधित बातम्या : 

हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील नुकसानाची पाहणी