Tauktae Cyclone: रत्नागिरीच्या देवरुखमध्ये भलमोठं झाडं कोसळलं, तोक्ते चक्रीवादळामुळं वाऱ्यांचा वेग 40 किमी

तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदूर्गमध्ये दिसत असून त्याचा प्रभाव आता रत्नागिरीत दिसू लागलाय.रत्नागिरीत वेगवान वारे वाहू लागलेत.समुद्राच्या लाट देखील मोठ्या प्रमाणात उसळू लागल्यात.

1/6
तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदूर्गमध्ये दिसत असून त्याचा प्रभाव आता रत्नागिरीत दिसू लागलाय.रत्नागिरीत वेगवान वारे वाहू लागलेत.समुद्राच्या लाट देखील मोठ्या प्रमाणात उसळू लागल्यात.
2/6
Pandurang Ghug Tree collapse
वेगाने वारे वाहू लागल्याने देवरुखमधील हरपुडे येथे झाड उन्मळून पडले.भलमोठं झाल हे बुधाजी घुग आणि पांडूरंग घुग यांच्या घरावर हे झाड पडलं.यामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी घराचं मोठं नुकसान झालय.ग्रामस्थांकडून हे झाड कटींग करुन बाजूला करण्याचं काम सुरु आहे.
3/6
Pandurang Ghug Tree collapse
अरबी समुद्र मध्ये तयार झालेली चक्रीवादळ रत्नागिरी पर्यंत पोहोचले. गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या या वादळाचे परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर जाणवू लागलेत.
4/6
Pandurang Ghug Tree collapse
जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला. किनारपट्टी भागात 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला पा सुरुवात झालीये. किनारपट्टी भागात लाटांचं रौद्र रूप पाहायला मिळते आहे. तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनार्‍यावर ती पहायला मिळतात.
5/6
Pandurang Ghug Tree collapse
चक्रीवादळ गोव्याच्या 120 किलोमीटर दूर आहे. मुंबईपासून 400 किलोमीटर दूर आहे. मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.. रायगड कोकण परिसरात अतिमूसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळाचा सध्याचा फ्लो पाहता गोव्याहून ते पुढे सरकत आहे असं दिसतंय. गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढताना दिसतोय.
6/6
Pandurang Ghug Tree collapse
चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासन अ‌ॅलर्ट आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी आहे. तर आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी लागू करण्यात आलीय. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.