मोठी बातमी! अखेर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा; तारीखही ठरली, केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत एल्गार
Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत परवानगीसाठी पोलिसांनाा पत्र लिहिण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टी पुन्हा आंदोलन करणार आहे. आंदोलनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या गलथान कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. याबाबत परवानगीसाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. सीजेपीच्या राष्ट्रीय संगठन प्रमुखांकडून पत्र पाठवण्यात आले आहे. या आंदोलनाचे स्थळ आणि तारखेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगच्या गलथान कारभाराविरोधात काक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. 2 आक्टोंबर 2026 रोजी दादर शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याबाबत मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. आंदोलन संविधानाला अनुरूप आणि शांतिपूर्ण होणार आहे, असा उल्लेख शिवाजी पार्क पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात केला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय संगठन प्रमुख अजिंक्य शिंदे यांच्या वतीने हे पत्र देण्यात आले आहे.
यानंतर आता कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पक्षाच्या २ ऑक्टोबरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील आणि निवडणूक प्रक्रियेतील उत्तरदायित्व सुधारण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. सोनम वांगचुक म्हणाले की, ते आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता नाही. त्यांच्या सहभागाशिवायही आंदोलने टिकून राहिली पाहिजेत यावर त्यांनी जोर दिला.
सोनम वांगचुक म्हणाले की, माझ्यासाठी चळवळींना पाठिंबा देण्यामागची मूळ कल्पना ही आहे की, या चळवळी स्वयंपूर्ण असाव्यात. त्यामुळे आता त्या मुद्द्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. हे पाहून मला आनंद होत आहे. म्हणूनच मला आशा आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर माझी गरज भासणार नाही,” असे ते म्हणाले.
निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत मतदार नोंदणी, नावे वगळणे व पुनर्संचयित करणे आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी यासंबंधीच्या निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवला होता. या वृत्तामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून वाद निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली.