Weather Alert : राज्यात वारं फिरलं, महाराष्ट्रात IMD चा मोठा अलर्ट, नोव्हेंबरमध्येच थेट..
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुन्हा वारं फिरलं आहे. पुढील चार दिवसांपासून मोठा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्रातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात पाऊसही झाला. आता तापमानात मोठी घट होत आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्यात दाखल होत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंडीमुळे राज्यात गारवा जाणवत आहे. कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात धुक्याची चादर पसरली आहे. काही भागात 16 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचण्याची शक्यता आहे.
गुलाबी थंडी वाढत असतानाच नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला. पहाटे थंडी वाढत आहे. बीड, परभणी, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड जालना आणि लातूर जिल्ह्यात तापमान कोरडे राहिल.
विदर्भात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान थंडीही वाढेल. अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहिल.
यासोबतच तापमानात घट होईल. भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा अलर्ट जारी केला. पुढील चार ते पाच दिवसात थंडी वाढेल. यादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले.