शासकीय डॉक्टरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, डॉक्टराच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी समिती स्थापणार
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवरील हल्ले इतर महत्वांच्या मागण्यासाठी आता एका दहा सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

शासकीय डॉक्टरांसाठी एक मोठी बातमी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी १० सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. शासकीय डॉक्टरांच्या कामाचे तास आणि ‘DACP’ योजनेवर ही विशेष समिती अभ्यास करणार आहे.
एका विशेष समितीची स्थापना
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. १६ सप्टेंबरच्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही १० सदस्यीय उच्च स्तरीय समिती डॉक्टरांच्या विविध समस्यांवर अभ्यास करणार आहे. समितीचा अभ्यास अहवाल आणि आयुक्तांच्या अभिप्रायानंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.
शासकीय डॉक्टरांचे कामाचे तास त्यांच्या पदाच्या स्वरूपानुसार (कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी किंवा निवासी डॉक्टर) ठरवले जातात, तर ‘DACP’ (डायनॅमिक ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन) ही रिक्त पदांशी संबंध न ठेवता ठराविक वर्षांनंतर पदोन्नती देणारी योजना आहे.