कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती 5 ऑगस्टला; सर्व आरोपींना केले जाणार हजर

| Updated on: Jul 27, 2022 | 5:09 PM

कोल्हापूरः ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांची हत्या होऊन सात वर्षे गेली तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी आजही मोकाटच असल्याचे कोल्हापुरातील (Kolhapur)  पुरोगामी संघटनाकडून बोलले जात आहे. तर आज मात्र कॉम्रेड. गोविंदराव पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी (Murder Matter) संशयित 9 आरोपींवर आरोपनिश्चितीसाठी नोटीस काढण्यात […]

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती 5 ऑगस्टला; सर्व आरोपींना केले जाणार हजर
Follow us on

कोल्हापूरः ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांची हत्या होऊन सात वर्षे गेली तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी आजही मोकाटच असल्याचे कोल्हापुरातील (Kolhapur)  पुरोगामी संघटनाकडून बोलले जात आहे. तर आज मात्र कॉम्रेड. गोविंदराव पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी (Murder Matter) संशयित 9 आरोपींवर आरोपनिश्चितीसाठी नोटीस काढण्यात आली होती. त्या 9 पैकी 3 आरोपींना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

इतर आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच सुनावणी

वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. मात्र यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आले की, इतर आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या असंही यावेळी सांगण्यात आले.

पुढील सुनावणी 5 ऑगस्टला

या प्रकरणातील इतर आरोपींना ज्यावेळी न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यावेळी संशयितांवरील आरोप निश्चितीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी केली. त्यामुळे वकील समीर पटवर्धन यांच्या मागणीनंतर आता पुढील सुनावणी 5 ऑगस्टला केली जाणार आहे.

वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा

गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे यांनी यावेळी न्यायालयाकडे वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा अशी मागणी केली आहे.

पुरोगामी संघटनांकडून जाब

पुण्यात नरेंद्र दाभोळकर, धारवाडमध्ये एम. एम. कलबुर्गी तर बेंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर साऱ्या देशाला हादरा बसला होता. विचारवंतांच्या हत्या झाल्याने देशभर मोर्चे, आंदोलने झाली होती, तरीही या प्रकरणातील काही आरोपी अजून मोकाटच असल्याने पुरोगामी संघटनांकडून वारंवार या विचारवंताच्या हत्येबद्दल आंदोलनं आणि मोर्च काढून सरकारला जाब विचारण्यात येतो.