AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत पदवीधर मतदरासंघाच्या उमेदवारीवरून संघर्ष; भाजपकडून कोणाचे ‘लाड’ होणार? राष्ट्रवादीच्या मागणीने ट्विस्ट

महायुतीत पदवीधर मतदरासंघाच्या उमेदवारीवरून संघर्ष पेटला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार,याकडे साऱ्याचंं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी देखील आग्रही आहे.

महायुतीत पदवीधर मतदरासंघाच्या उमेदवारीवरून संघर्ष; भाजपकडून कोणाचे 'लाड' होणार? राष्ट्रवादीच्या मागणीने ट्विस्ट
Mahayuti newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 10:08 AM
Share

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजप, सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी, शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीमधील पक्षांमध्येच संघर्ष समोर येत आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत देखील कोणाला संधी द्यायची,यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उमेदवारीवरून झालेल्या संघर्षात आता राष्ट्रवादीच्या मागणीने ट्विस्ट निर्माण झाला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्यी उमेदवारीवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार प्रताप माने यांनी आमदार शरद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. मात्र पदवीधरांच्या प्रश्नावर विधान परिषद आणि विधानसभेत आमदार अरुण लाड यांनी कधीच आवाज उठवला नाही,असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रताप माने यांनी केला आहे. आमदार अरुण लाड यांच्या कामगिरी पदवीधरांना चांगलीच माहित आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर उत्तर देतील,असे देखील माने यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या पार पडलेल्या आढावा बैठकीत माने बोलत होते.

मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले?

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही अश्वमेध सोडला आहे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेऊ,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी थांबवून, प्रताप माने यांना दिलेले शब्दाप्रमाणे पाठिंबा द्यावा,असे आवाहन देखील यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी सांगलीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तर पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये संघर्ष वाढणार आहे,हे आता नक्की झाले आहे .

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच