AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात राजकारण पेटलं! अमित शाहांच्या सभेआधी मोठा राडा; काँग्रेस-वंचित उतरली रस्त्यावर

अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस-वंचितने आंदोलनाचा नारा दिला आहे.

पुण्यात राजकारण पेटलं! अमित शाहांच्या सभेआधी मोठा राडा; काँग्रेस-वंचित उतरली रस्त्यावर
| Updated on: Aug 01, 2026 | 11:53 AM
Share

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमित शहा यांच्या सभेआधीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा नारा दिला. अमित शाह यांच्या विरोधात पोस्टर झळकवत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाआधी राजकारण तापलं आहे. पुण्यात अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरून आंदोलक अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

पुण्यात काँग्रेसचा अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध 

केंद्रीय अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री काही युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्व पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसत आहे. पोलिसांनी रात्री कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतरही आज शनिवारी काँग्रेस कार्यकर्ते पुण्यातील मार्केट यार्ड चौकात मोठ्या संख्येने जमले. यावेळी आंदोलकांनी काळे फुगे देखील आणले होते. पोस्टर आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध केल्याचे दिसून आलं. परंतु पुरस्कार सोहळाच्या आयोजित कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जाऊन विरोधकांच्या आंदोलनाचा निषेध नोंदवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Follow Us
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन