काँग्रेसची मोठी खेळी, भाजपच्या दोन ताकदवान नेत्यांविरोधात कुणाला दिली उमेदवारी?

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेसची मोठी खेळी, भाजपच्या दोन ताकदवान नेत्यांविरोधात कुणाला दिली उमेदवारी?
रावसाहेब दानवे आणि सुभाष भामरे
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 9:59 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे दिग्गज नेते उमेदवार आहेत. जालन्यात कल्याण काळे यांची लढाई ही भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासोबत होणार आहेत. तर धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांचा सामना भाजप नेते तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी होणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ताकदवान आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या पराभावाचं कडवं आव्हान काँग्रेसला असणार आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शोभा बच्छाव या धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे त्यांची धुळे आणि नाशिकमध्ये ताकद आहे. धुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील आमदार आहेत. त्यांचे वडील रोहिदास पाटील हे माजी मंत्री आहेत. या मतदारसंघात एमआयएमचीसुद्धा ताकद आहे. कारण मुस्लीम बहुल मतदारसंघात एमआयएमने आपली ताकद निर्माण केली आहे. विशेष म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार फारुक अन्वर शाह हे एमआयएम पक्षाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय एमआयएमकडून नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘मी धुळ्याची लेक तर बागलाणची सून’

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शोभा बच्छाव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मला पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याचं समाधान वाटतंय. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार. मी धुळ्याची लेक आहे तर बागलाणची सून आहे. मला धुळ्याची पालकमंत्री असताना समस्या आणि प्रश्नांची जाणीव आणि माहिती आहे. मला कुठलेही आव्हान मोठं वाटत नाही. जनतेने संधी दिल्यास धुळे मतदारसंघाचा विकास करणार”, अशी प्रतिक्रिया शोभा बच्छाव यांनी दिलीय.

जालन्यात काँग्रेसची मोठी खेळी

दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे 1999 पासून खासदार आहेत. असं असलं तरी काँग्रेसकडून यावेळी मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे. काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण काळे 2009 मध्येही काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी केवळ 8 हजार मतांच्या फरकाने कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. याच कल्याण काळे यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जालन्याची लढत भाजपसाठी यावेळी सोपी नाही हे स्पष्ट आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.