काँग्रेसने अखेरचा डाव टाकला, मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

काँग्रेसने अखेरचा डाव टाकला आहे. विरोधकांनी मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं, जाणून घ्या

काँग्रेसने अखेरचा डाव टाकला, मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
mk stalin News
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 3:10 PM

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षाने बैठकांचा सपाटा लावला आहे. इंडिया आघाडील प्रमुख नेत्यांनी एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतून विमानाने विरोधकांनी चेन्नई गाठली. एका विमानात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, अभिषेक बॅनर्जी, मीसा भारती, समाजवादी पक्षाचे दोन खासदार, कपिल सिब्बल होते. विरोधकांनी चेन्नई गाठल्यानंतर नेत्यांच्या बैठकीचा फोटो समोर आला आहे. या बैठकीत विरोधकांकडून एम के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डिलिमिटेशन विधेयकावरून चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते एमके स्टॅलिन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचले आहेत. इंडिया आघाडीचे नेते आज डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतील. या भेटीत इंडिया आघाडीचे नेते डिलिमिटेशन विधेयकाबद्दल फेरविचार करण्याची विनंती करणार आहेत.

Loading...


ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us