Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 432 नवे कोरोनाबाधित, 14 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jul 07, 2021 | 11:44 PM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 07 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 432 नवे कोरोनाबाधित, 14 रुग्णांचा मृत्यू
corona virus
Follow us on

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,027 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,61,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,827 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.02% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 07 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2021 08:29 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात दोन नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

    अकोल्यात कोरोना अपडेट :

    अकोल्यात आज दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एक मृत्यू

    आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56360 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 164 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 68 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 07 Jul 2021 06:52 PM (IST)

    नागपुरात आजही कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद, दिवसभरात 20 नवे कोरोनाबाधित

    नागपूर :

    नागपुरात आजही कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद

    20 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    तर 22 जणांनी केली कोरोना वर मात

    एकूण रुग्ण संख्या – 477250

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 468064

    एकूण मृत्यू संख्या – 9031


  • 07 Jul 2021 06:51 PM (IST)

    संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

    राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून  कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स)  व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

  • 07 Jul 2021 06:49 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 432 नवे कोरोनाबाधित, 14 रुग्णांचा मृत्यू

    पुणे :
    दिवसभरात ४३२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात २७१ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.
    -२५२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८०५८२.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८७१.
    – एकूण मृत्यू -८६२८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६९०८३.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७०२६

  • 07 Jul 2021 04:43 PM (IST)

    सांगलीतील व्यापारी आक्रमक, उद्यापासून शहरातला व्यापार सुरू करण्याचा निर्धार

    सांगली :

    सांगलीतील व्यापारी आक्रमक, उद्यापासून शहरातला व्यापार सुरू करण्याचा निर्धार करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दुकाने उघडण्याचे केले जाहीर, प्रशासनाने वेळेची मर्यादा घालून परवानगी द्यावी, अन्यथा जगण्यासाठी आम्हाला दुकाने उघडण्याशिवाय पर्याय नसल्याचा सांगली व्यापारी महासंघाचा इशारा

  • 07 Jul 2021 10:11 AM (IST)

    दोशात गेल्या 24 तासातं 43,733 नवे कोरोना रुग्ण

  • 07 Jul 2021 07:36 AM (IST)

    कोल्हापूर शहारानंतर आता जिल्ह्यातील इतर शहरांमधील दुकान सुरू करण्यासाठी व्यापारी आक्रमक

    कोल्हापूर –

    कोल्हापूर शहारानंतर आता जिल्ह्यातील इतर शहरांमधील दुकान सुरू करण्यासाठी व्यापारी आक्रमक

    इचलकरंजीतील दुकान सुरू करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात

    राज्य शासनाने उद्या पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू

    माजी खासदार शेट्टी यांचा इशारा

    आपल्या मतदार संघासाठी वेगळा आणि उर्वरित शहरांसाठी वेगळा न्याय का ?

    गोकुळ निवडणूक,राजकीय कार्यक्रम आणि सभांवेळी नियम आड आले नाहीत का ?

    माजी खासदार राजू शेट्टी यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांना सवाल

  • 07 Jul 2021 07:08 AM (IST)

    नागपुरात एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना पॅाझिटीव्ह

    – नागपुरात एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना पॅाझिटीव्ह

    – डेल्टा प्लस संशयित म्हणून नमुने हैदराबादला तपासणीसाठी पाठवले

    – खबरदारीचा उपाय म्हणून सहा जणांना आमदार निवासात केलं क्वॅारंटाईन

    – सहापैकी एका रुग्णाची पुणे प्रवासाची पार्श्वभुमी

    – जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २१ नवे रुग्ण, १६ जणांनी केली कोरोनावर मात

    – सलग दोन महिन्यानंतर कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त

  • 07 Jul 2021 06:52 AM (IST)

    जिल्ह्याला आता १५ कोटी ६७ लाख ३९ हजार रुपयांचा निधी कोरोना नियंत्रणासाठी उपलब्ध

    पुणे :

    जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्याला आणखी १४ कोटी ४ लाख ३९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला

    याआधी १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता

    यामुळे जिल्ह्याला आता १५ कोटी ६७ लाख ३९ हजार रुपयांचा निधी कोरोना नियंत्रणासाठी उपलब्ध

  • 07 Jul 2021 06:45 AM (IST)

    महाराष्ट्रात 3 कोटी 40 लाख 76 हजार 407 नागरिकांचे लसीकरण

    महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 40 लाख 76 हजार 407 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 4 जुलै 2021 रोजी 1,35,630 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

  • 07 Jul 2021 06:38 AM (IST)

    राज्यात 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

    राज्यात काल 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,027 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,61,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,827 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.02% झाले आहे.