बीडच्या दिंद्रुड येथील पॅनलप्रमुखांच्या मुलावर गुन्हा, खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पॅनलप्रमुख दिलीप कोमटवार यांचा मुलगा अमित कोमटवार यांच्यावर पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बीडच्या दिंद्रुड येथील पॅनलप्रमुखांच्या मुलावर गुन्हा, खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:02 PM

बीड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामपंचायती साठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे (Beed Dindrud Panel Head). अशात प्रचार गरम असताना राजकीय द्वेषातून तंटे वाढत चालल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पॅनलप्रमुख दिलीप कोमटवार यांचा मुलगा अमित कोमटवार यांच्यावर पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे (Beed Dindrud Panel Head).

सदर गुन्हे राजकीय द्वेषातून केल्याचा आरोप पॅनलप्रमुख आणि उमेदवारांनी केला आहे. घटना घडलीच नाही, मात्र तसा बनाव करुन पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सत्यता असेल तर नक्कीच आम्ही कारवाईला सामोरे जाऊ असा पवित्रा उमेदवारांनी घेतला आहे. खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी ग्रामपंचायत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून दिंद्रुड ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. याच दिंद्रुड सर्कलमधून विधानसभेच्या निवडणुकीची दिशा देखील ठरवली जाते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. या ग्रामपंचायतीत एकूण 15 सदस्य आहेत. ग्रामपंचायतीवर आपली सत्ता यावी यासाठी परिवर्तन ग्रामविकास पॅनल आणि जनविकास आघाडी या दोन पॅनल मध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचार जोरात सुरु आहे, अशातच परिवर्तन ग्रामविकासचे पॅनल प्रमुख दिलीप कोमटवार यांचा मुलगा अमित कोमटवार याच्यावर दिंद्रुड पोलिसात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदर गुन्हे खोटे असून हे राजकीय द्वेषापोटी केल्याचा आरोप परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी केले आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सची चौकशी करुन सत्यता बाहेर आणावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेऊन आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 1 जानेवारीला दिलीप कोमटवार यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना निवेदन देखील दिलं होतं (Beed Dindrud Panel Head).

त्यानंतर पाच दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांच्या कृतीवर संशय व्यक्त होतो आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी असल्यास कारवाई व्हावी. यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. या प्रकरणात पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला आहे.

Beed Dindrud Panel Head

संबंधित बातम्या :

संभाजीनगर नावावरुन राज्यात चर्चा, तीन पक्ष मिळून तोडगा काढू : गुलाबराव पाटील

काल भाजप सदस्यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा, आज पंकजांची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

भरपूर फिरा, लोकांची कामे करा, पण लोकांनाच फिरवू नका; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.