शिंदे गटाच्या मंत्र्याचा मुलगा आणि सून शंकर-पार्वतीच्या वेशात, सोबत मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदेही, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Dec 29, 2022 | 12:52 PM

शंकर पार्वतीची वेशभूषा केलेलं दाम्पत्य आणि सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार शिंदे उपस्थित असल्याने संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्याचा मुलगा आणि सून शंकर-पार्वतीच्या वेशात, सोबत मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदेही, व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : सध्या सोशल मीडियावर शंकर पार्वतीची वेशभूषा केलेलं एक दाम्पत्य आणि त्यांच्या बाजूला खासदार श्रीकांत शिंदे हे उभा असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दुसऱ्या फोटोत पार्वतीची वेशभूषा केलेल्या महिलेच्या हातात बाळ असलेला फोटोही व्हायरल होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कुणी स्वागत करत आहे तर कुणी टीका करत आहे. हा फोटो मालेगाव येथे काढण्यात आला असून दोन दिवसांपूर्वीचा हा फोटो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान मालेगाव येथे दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. प्रदीप मिश्रा यांच्या माध्यमातून ही महा शिवपुराण कथा सांगितली जात आहे. त्या दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मुलगा आविष्कार भुसे आणि त्यांची सूनबाई यांनी शंकर पार्वतीची वेशभूषा केली होती. यावेळी शिवपुराण कथेला भेट देण्यासाठी आलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या समवेत फोटो काढला होता.

श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर फोटोत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते आणि शंकर पार्वतीची वेशभूषा केलेले भुसे दाम्पत्य आहेत.

हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, नेटकरी या फोटोत विविध कमेंट्स करत आहे, यामध्ये कुणी कौतुकाच्या तर काहींकडून टिकेच्या प्रतिक्रिया येत आहे.

हे सुद्धा वाचा

शंकराला दाढी होती का? अशी वेशभूषा करून तुम्हाला काय मिळणार आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहे, तर काहींनी या वेशभूषा केल्याने त्यांचे जोरदार कौतुक केलं आहे.

दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांनीच मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे नियोजन केले आहे, लाखों भाविकांचे नियोजनही आविष्कार यांच्या माध्यमातून होत असल्याने त्यांच्या कृतीचे स्वागत होतांना दिसून येत आहे.