आवाज आईला ऐकू जाईल म्हणत तो शारीरिक संबंध… विनायक राऊत यांच्या सूनेचा धक्कादायक खुलासा, थेट पोलिसात..
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या सूनेने केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली. धक्कादायक आरोप तिने पोलिस तक्रारीत केले. या प्रकरणात पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राऊतांची सून गिरीजा राऊत हिने अत्यंत गंभीर आरोप केले.

शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाबद्दल हादरवणारे आरोप त्यांची सून गिरीजा राऊत हिने केले. विनायक राऊत यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेचे नगरसेवक गितेश राऊत याच्यावर पत्नीने गंभीर आरोप केले. विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यासह तब्बल 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोमूत्र पाजवले, केस कापले यासोबतच पतीने हनिमूनला जाऊनही शारीरिक संबंधांना नकार दिला. विदेशात फिरण्यासाठी गेले असता त्याच्या जवळ गेल्याने बेदम मारहाण केली. यासोबतच खायला अन्न देखील दिले नसल्याचे खळबळजनक आरोप विनायक राऊत यांच्या सूनेने केले. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. गिरीजा राऊत यांनी आपल्या पोलिस तक्रारीत धक्कादायक आरोप केली आहेत.
या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये आणि काैटुंबिक छळ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन बाबांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. यादरम्यान गिरीजा राऊत यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले की, शारीरिक जवळीक साधल्यास मला तो दूर लोटत. तो मला कायम सांगत की, मी खूप नाजूक मुलगा आहे. काही अक्कल आहे का? तू मला हात का लावतेस?
आपण जर घरी जवळीक साधल्यास आईला कळेल. आम्ही गावी गेल्यावर तो म्हणत की, इकडे आपण काही करू शकत नाहीत, तो मदतनीस रवी दादाला ऐकू जाईल, असे म्हणत तो माझ्यासोबत शारीरिक संबंधाला नकार देत हेच नाही तर त्याने असेही म्हटले की, सेक्स भारतात करायला त्याला व्यवस्थित वाटत नाही. विदेशात गेल्यावर करू.
पण ज्यावेळी आम्ही विदेशात गेलो होते, त्यावेळी मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने मला मारहाण केली. आमच्या प्रचंड मोठी भांडणे झाली होती. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेने केलेल्या या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या सर्व आरोपांवर आता विनायक राऊत नक्की काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.