सूनेने सासूचे दागिने चोरुन विकत घेतला आयफोन, नागपूरमधील घटनेने एकच खळबळ

अनेक घरांमध्ये सासू आणि सूनेचं फारसं पटत नाहीच, ज्यामुळे सासू आणि सूनेचे वाद कायम होतंच असतात. पण आता आयफोन घेण्यासाठी सूनेने सासूचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे... तर जाणून घ्या सूनेनं नेमकं केलं तरी काय..

सूनेने सासूचे दागिने चोरुन विकत घेतला आयफोन, नागपूरमधील घटनेने एकच खळबळ
| Updated on: Nov 10, 2026 | 8:56 AM

सासू – सूनेच्या नात्याची चर्चा सर्वच कुटुंबात सुरु असते. दोघांमधील वाद, भाडणं, गैरसमज… अशा अनेक कारणांमुळे दोघींमध्ये सतत वाद देखील होत असतात. पण आता अशी एक घटना समोर येत आहे, ज्यामुळे तुम्हाला देखील मोठा धक्का बसले. महागडा आयफोन घेण्यासाठी सूनेनेच सासूचे दागिने विकले. समोर येत असलेल्या माहितीनुसार,  आयफोनची (iPhone) हौस भागवण्यासाठी एका सुनेने स्वतःच्याच सासूच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा एक धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.

सासूने कपाटात जपून ठेवलेले सोन्याचे दागिने विकून सुनेने ॲपल कंपनीचा नवीन आयफोन खरेदी केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेमुळे शांतीनगर परिसरात आणि संबंधित कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रंथाली आकाश वर्मा असे आरोपी सुनेचे नाव असून, राधा वर्मा  यांनी याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading...

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधा वर्मा यांना शिर्डी येथे दर्शनासाठी जायचं होतं. प्रवासाचा खर्च करण्यासाठी आणि काही दागिने सोबत नेण्यासाठी त्यांनी घरातील कपाट उघडले. मात्र, कपाटात ठेवलेले तब्बल 53  ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दागिने कपाटात नाहीत समजल्यानंतर राधा यांना मोठा धक्का बसला.

आयुष्यभर कष्टाने जपलेले सोन्याचे दागिने अचानक गायब झाल्याने राधा वर्मा यांना मोठा धक्का बसला. यापूर्वीही सुनेविरोधात चोरीचा संशय किंवा गुन्हा दाखल असल्याने, त्यांचा पहिला संशय त्यांची सून ग्रंथाली हिच्यावरच गेला. दागिने चोरीला गेल्याचं कळताच, राधा वर्मा यांनी सुनेला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता, तिने दागिने चोरल्याची कबुली दिली आणि ते लवकरच परत करण्याचे आश्वासनही दिले.

मात्र, वारंवार सांगून आणि विनंती करूनही तिने दागिने परत न केल्याने, अखेर सासूने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत कसून चौकशी केली असता, सुनेने सासूचे दागिने चोरून ते बाहेर विकले आणि त्या मिळवलेल्या पैशातून ॲपल कंपनीचा महागडा आयफोन खरेदी केल्याची धक्कादायक कबुली दिली. शांतीनगर पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us