Daughter Murder: मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं बापानं पोटच्या लेकीलाच संपवलं! नांदेडमधील धक्कादायक घटना

| Updated on: Apr 20, 2022 | 8:58 PM

घरागुती वादातून आईला व मुलीला मारहाण केली गेल्याने त्या मारहाणीत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार झाला आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत.

Daughter Murder: मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं बापानं पोटच्या लेकीलाच संपवलं! नांदेडमधील धक्कादायक घटना
जन्मदात्याकडून मुलीचा खून
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड: महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात घडली आहे. एकीकडे सरकारी पातळीवर मुलींचा जन्मदर घटतो आहे म्हणून राज्य, केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात मात्र मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून जन्मदात्याने मुलीलाच (Daughter Murder) संपवल्याची घटना जामखेडमध्ये घडली आहे. घरागुती वादातून आईला व मुलीला मारहाण केली गेल्याने त्या मारहाणीत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार झाला आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत.

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील जामखेड गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जामखेड (Jamkhed) गावातील बालाजी देवकते या शेतकऱ्याने आपल्या 18 वर्षाच्या सिंधू या मुलीची सोयरीक जुळवली होती. मात्र लग्नासाठी पैसा जमा करता आला नसल्याने बालाजी गेल्या काही दिववसांपासून हतबल झाला होता. या वादातूनच त्यांनी बायको आणि मुलीवर हल्ला केला आहे. त्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलीस त्याचा तपास करत आहेत.

मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने त्यांच्या घरात सध्या वाद होत होते, त्यातून कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन निराश झालेल्या बालाजीने संतापाच्या भरात शिवीगाळ करत पत्नी आणि मुलीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. त्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसात जन्मदात्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपी फरार झाला आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेची चौकशी पोलीस करत असून ज्या बापाने मुलीला मारले आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे. मुलीच्या लग्नाच्या दिवसातच अशी घटना घडल्याने पोलीसही संभ्रमात सापडले होते. त्यामुळे पोलिसांनी आता आपला तपास आणखी वाढवला असल्याचे सांगितेले आहे. बापाचा शोध घेत असून त्याबाबत कुटुंबाकडून अधिक चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या

Gunratna Sadavarte : भारत माता की जय… आर्थर रोड कारागृहाबाहेर माध्यमांसमोर गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी!

आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?