AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!

लवकरच केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक राज्यमंत्रिपदही मिळू शकते. या सर्व चर्चा सुरू असतानाच शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली.

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच...दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!
eknath shinde and amit shahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 6:32 PM
Share

Eknath Shinde Amit Shah Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री (15 जुलै) दिल्लीच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे तसेच नुकतेच ठाकरे गटातून आलेले 6 खासदार त्यांच्यासोबत या बैठकीत हजर होते. अमित शाहा आणि शिंदे यांच्यात एकूण 45 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत बंद दाराआड वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सहा खासदारांना अमित शाहा यांच्याकडून मोठे आश्वासन मिळाल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीतील बैठकीत नेमकं काय घडलं?

लवकरच केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक राज्यमंत्रिपदही मिळू शकते. या सर्व चर्चा सुरू असतानाच शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. याच बैठकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही माहिती दिली आहे. अमित शाह यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही गेलो होतो. खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामाचे विकास प्रस्ताव, पत्र आम्ही अमित शाह यांना दिले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच श्रीकांत शिंदे यांनी सर्व नव्या आणि जुन्या खासदारांशी समन्वय साधावा, असेही शाह यांनी सूचित केल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

अमित शाह यांच्याकडून नेमका काय शब्द मिळाला?

दरम्यान, अमित शाह यांनीदेखील ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या विकासकामाबाबत काही मागण्या केल्याचे बोलले जात आहे. यावर कोणालाही निधी कमी पडू देणार नाही. निश्चिंत राहा असा शब्द अमित शाह यांनी सहा खासदारांना दिलेला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात नेमके काय बदल दिसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक