AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्या भेटीला सुनेत्रा पवार, पुण्यात घडामोडींना वेग, काही वेळातच..

पुणे दाैऱ्यावर अमित शाह आहेत. अमित शाह यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यादरम्यान काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. भाजपा कार्यकर्तेही काँग्रेस भवनासमोर आंदोलन करत आहेत.

अमित शाह यांच्या भेटीला सुनेत्रा पवार, पुण्यात घडामोडींना वेग, काही वेळातच..
Amit Shah and Sunetra Pawar
| Updated on: Aug 01, 2026 | 11:29 AM
Share

गृहमंत्री अमित शाह पुणे दाैऱ्यावर आहेत. रात्री उशीरा ते पुण्यात दाखल झाले. अमित शाह ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पुण्यात आहेत. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्येही आक्रमक भूमिका घेत आहेत. काँग्रेस भवनासमोर मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्ये जमले असून त्यांच्याकडून आंदोलन केले जातंय. यादरम्यानच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अमित शाह यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. अमित शाहंची भेट सुनेत्रा पवार घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यादरम्यान उपस्थित असण्याचा अंदाज आहे. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यानंतर वातावरण अधिक चिघळताना दिसत आहे.

सुनेत्रा पवार गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला 

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात काँग्रेस आणि वंचितचे आंदोलन पेटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यादरम्यान दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रपती एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यावरही अमित शाह आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा हॉटेल रिट्ज बाहेर तैनात आहे. अमित शाह निघण्याच्या हालचाली सुरू आहेत. थोड्याच वेळात सारसबागेकडे ते निघू शकतात. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळत होती.

गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा 

संजय राऊत यांनीही अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यावर टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, गृहमंत्री अमित शाह अंधारात पुण्यात आले. ते देशाचे गृहमंत्री आहे, त्यांना कोणाची भीती आहे. अमित शाह संसदेत उपस्थित राहत नाहीत आणि पुण्यात येतात, असेही त्यांनी म्हटले. पुण्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त अमित शाह यांच्या दाैऱ्यादरम्यान ठेवला आहे. अमित शाह यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतंय.

Follow Us
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल