समृद्धी महामार्ग मी आणि एकनाथ शिंदेंनी केला, उद्धव ठाकरेंचा काय संबंध? देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर खुलासा केला. एकनाथ शिंदे आणि मी कशाप्रकारे हा समृद्धी महामार्गा बनला हे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाचे श्रेय ठाकरेंना देऊ शकत नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

समृद्धी महामार्ग मी आणि एकनाथ शिंदेंनी केला, उद्धव ठाकरेंचा काय संबंध? देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis
| Updated on: Jan 12, 2026 | 12:38 PM

महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी सातत्याने राजकीय पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची tv9 मराठीचे मॅनेजिंग एटिडर उमेश कुमावत यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले. 2017 पासून नक्की काय घडत होते, यावर बोलताना ते दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना म्हटले की, शिंदेंना एमएसआरडीसी दिलं. त्यांना नको होते. त्या खात्यात काहीच नसल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलं. शिंदे नाराज होते. मी त्यांना म्हटलं हे खातं आपण मोठं करू. हा प्रोजेक्ट होईल असं शिंदेंना वाटत नव्हतं. मी म्हटलं काळजी करू नका म्हटलो.

मी एमएसआरडीसी आणि इतर ठिकाणाहून पैसे घेतले आणि जमीन अधिग्रहण करताना थेट खरेदीने जमीन घेण्याचा निर्णय घेतला. मी झोला छाप लोकांची टीम तयार केली. या लोकांनी प्रत्येक गावात जाऊन रोडचा फायदा काय आणि तुम्हाला काय मिळणार हे समजावलं. लोक तयार झाले. त्यानंतर शिंदे त्या ठिकाणी गेले आणि एकाच दिवसात सर्व रजिस्ट्री केल्या.

त्यामुळे मी कधीच एकट्याचं श्रेय घेतलं नाही. तो समृद्धी मार्ग आहे. तो माझ्यामुळे आणि एकनाथ शिंदेमुळे आहे. ठाकरेंचं श्रेय यासाठी होणार नाही की ठाकरेंनी त्यांना वाळीत टाकलं होतं. मरी गाय बम्मन को दान ही म्हण आहे. ती मरी गाय शिंदेंना दिली. शिंदे तेव्हापासून नाराज आहेत. ते माझ्यासोबत आहेत, तेव्हापासून.

ज्या प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. त्याला श्रेय कसं मिळेल. उद्धव ठाकरेंचं समृद्धी महामार्गातील सहभाग काय माहीत आहे. 70 टक्के महामार्ग झाला. तेव्हा त्यांनी फक्त त्याला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं. त्याचा आनंद आहे. ते कोणत्या पदावर आहेत. कोणत्या संवैधानिक पदावर आहे. मग कसं श्रेय मिळेल? नाहीच श्रेय त्यांचं. संबंधच नाही, असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.