Gokul Election: गोकुळच्या वादात मोठा ट्वीस्ट! सतेज पाटलांवरच गुन्हा दाखल होणार? भाजप नेत्याने सांगितली नेमकी चूक

सर्व 13 जणांना नोटीस दिल्याचे मविआच्या वकिलांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या तीन लोकांना नोटीस पोहोचलीच नाही," असा मोठा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे.

Gokul Election: गोकुळच्या वादात मोठा ट्वीस्ट! सतेज पाटलांवरच गुन्हा दाखल होणार? भाजप नेत्याने सांगितली नेमकी चूक
Image Credit source: Google|
| Updated on: Nov 07, 2026 | 8:44 PM

Gokul Election News:  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राजकारण तापले आहे. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचे पॅनेल विजयी झालं आहे. मात्र 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीला महायुतीचे 12 संचालक गैरहजर राहिले अन् कोरम अभावी ही निवडणूक आणि सभा लांबणीवर पडली. त्यानंतर सतेज पाटील यांनी कोर्टातही धाव घेतली. याचबाबत आता एक मोठी बातमी समोर आली असून सतेज पाटील यांच्याकडूुन कोर्टात खोटे प्रमाणपत्र दिले असल्याचा दावा करत भाजप खासदार धनंजय महाडिक सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणालेत धनंजय महाडिक? 

Loading...

“गोकुळच्या चेअरमन निवडीच्या पहिल्या बैठकीला मविआचे 13 संचालक सभेला उपस्थित राहिले, महायुतीचे 12 संचालक अनुपस्थित राहिले आणि कोरम अभावी चेअरमन निवडीची सभा तहकूब झाली. त्यानंतर 30 तारखेला महाविकास आघाडीचे सतेज पाटील हे कोर्टात गेले. परंतु त्यादिवशी सर्व पक्ष उपस्थित नसल्याने कोर्टाने 2 तारीख दिली. मात्र त्यावेळी कोर्टाने मविआला महायुतीच्या 12 संचालकांना कोर्टाकडून किंवा वैयक्तिक नोटीस पाठवावी जेणेकरुन ते 2 तारखेच्या हेअरिंगला उपस्थित राहतील असं सुचवले होते. दोन तारखेला सुरुवातीलाच न्यायालायाने या नोटीसीबाबत विचारले. तेव्हा सर्व 13 जणांना नोटीस दिल्याचे मविआच्या वकिलांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या तीन लोकांना नोटीस पोहोचलीच नाही,” असा मोठा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे.

‘महायुतीचे संचालक कोर्टात जाणार…’

तसेच “सोमवारी हे तीन संचालक कोर्टात जाऊन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करणार आहेत. शशिकांत चुवेकर आणि 12 संचालकांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करणार आहोत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मंगळवारी निवडणूक असली तरी सोमवारी कंटेम्ट ऑफ कोर्ट दिले जाणार आहे,” असं धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे.

दरम्यान, “माजी गृहमंत्री राजकारणात खोट बोलतात हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे. मात्र कोर्टासमोरही खोटे बोलतात असं चित्र कालच्या प्रकरणावरुन दिसत आहे. त्यांच्यावर फौजदारीही होऊ शकते तसेच कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट मंगळवारी पाहायला मिळणार आहे, असे संकेतही धनंजय महाडिक यांनी दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us