
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात बीड, परळी आणि मुंडे कुटुंबाला फार महत्त्वाचे स्थान आहे. राज्याच्या विकासात मुंडे कुटुंबाचे फार महत्त्वाचे योगदान आहे. आता या कुटुंबातील पुढची पिढी राजकारणात येण्यासाठी तयार होत आहे. दरम्यान, याच मुंडे कुटुंबातील धनंजय मुंडे यांची जान्हवी नावाची कन्या सध्या अमेरिकेत राहून पत्रकार म्हणून महत्त्वाचं काम करत आहेत. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट करून मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, असं म्हटलंय.
धनंजय मुंडे यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांची कन्या जान्हवी यांच्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी माझी मुलगी सध्या अमेरिकेत असून ती प्रसिद्ध वृत्तसंस्थेत काम करत असल्याचे सांगितले आहे. तसेच माझ्या मुलींच्या संवेदनशीलतेचा, मेहनतीचा आणि प्रगतीचा मला खूप अभिमान वाटतो, अशा भावनाही मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो! जान्हवी सध्या Wesleyan University, USA मध्ये Government आणि Literature या दोन विषयांमध्ये पदवी घेत आहे. मानवी हक्कांसाठी अभ्यास करणं हे तिचं खास क्षेत्र आहे. कॉलेजच्या वृत्तपत्रात ती आधी फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख होती. आता ती संपूर्ण वृत्तपत्राची मुख्य संपादक झाली आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
तसेच, CT Mirror या अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेत ती सध्या पत्रकार म्हणून काम करते आहे. तिथे समाज, सरकार आणि लोकांच्या प्रश्नांवर ती संवेदनशीलपणे लिखाण करते आहे. शिक्षणासोबतच ती सोशल मिडिया आणि जेलमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थेत संशोधन करते आहे, असेही मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो!
जान्हवी सध्या Wesleyan University, USA मध्ये Government आणि Literature या दोन विषयांमध्ये पदवी घेत आहे. मानवी हक्कांसाठी अभ्यास करणं हे तिचं खास क्षेत्र आहे.
कॉलेजच्या वृत्तपत्रात ती आधी फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख होती, आता… pic.twitter.com/YXs3TOoZIw
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 29, 2025
बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो. ती जे काही करतेय, ते केवळ यशासाठी नाही, तर समाजासाठी आहे आणि हेच तिचं खऱ्या अर्थानं मोठेपण असल्याचेही मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.