जिममधील हटके फोटो शेअर करत धनंजय मुंडे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, थेट..

धनंजय मुंडे यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या या फोटोची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी आपला फिटनेस दाखवला आहे. जिममधील फोटो शेअर करत त्यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिममधील हटके फोटो शेअर करत धनंजय मुंडे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, थेट..
Dhananjay Munde
| Updated on: Nov 07, 2026 | 12:18 PM

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना अनोख्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य धनसंपदा असा संदेश देत त्यांनी आरोग्य आणि फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी एक खास फोटो जिममधील शेअर केला. हा फोटो अत्यंत खास आहे. या फोटोत त्यांचा पूर्ण फिटनेस दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी फोटोत बायसेफ दाखवला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जिममधील एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते जीममध्ये बॉडीबिल्डिंगची हटके पोज देताना दिसत आहेत. त्यांच्या या फिटनेस लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

ही धनत्रयोदशी उत्तम आरोग्याच्या संकल्पासह साजरी करूया, असा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. केवळ संपत्तीच नव्हे, तर उत्तम आरोग्य हीच खरी धनसंपत्ती असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांचा हा जिममधील हटके अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...

दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच आरोग्याचा संदेश देण्याची त्यांची ही पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. धनंजय मुंडे यांच्या या फोटोची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. धनंजय मुंडे कायमच सोशल मीडियावर जिममधील फोटो किंवा व्हिडीओ शेअर करतात. धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर त्यांना या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की, माझा या प्रकरणासोबत काहीच संबंध नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव संतोष देशमुख प्रकरणात आले. हेच नाही तर काही फोटोही या प्रकरणातील व्हायरल झाली. वाल्मिक कराड बीडच्या जेलमध्ये आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडून ही केस लढवली जात आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देताना तब्येतीचे कारण दिले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us