AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 70 लाख शेतकऱ्यांसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट, ती अडचण होणार लागलीच दूर

Chandrashekhar Bawankule E Pherphar: तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरीपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही. तिथे आता 'ई-फेरफार'द्वारे पीक पाहणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला याविषयीचे निर्देश दिले आहेत.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 70 लाख शेतकऱ्यांसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट, ती अडचण होणार लागलीच दूर
'ई-फेरफार'द्वारे पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
| Updated on: Nov 07, 2026 | 12:20 PM
Share

Chandrashekhar Bawankule E ferfar: राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता ‘ई-फेरफार’द्वारे पीक पाहणी करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास ७० लाख शेतकर्‍यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. पीक नोंदणी रखडू नये यासाठी आता तलाठी स्तरावर पाहणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.

आता नाही रखडणार पीक नोंदणी

राज्यातील दुर्गम भागातच नाही तर भौगोलिक आणि तांत्रिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक पाहणी करताना मोठी अडचणी निर्माण होते. तिथे ऑनलाई पीक नोंदणी शक्य होत नाही. अशा ठिकाणी ई-फेरफार प्रणालीद्वारे पीक पाहणी करण्यात येणार आहे. यामुळे कोणतीही नोंद रखडणार नाही. राज्यातील जवळपास ७० लाख शेतकर्‍यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतलाय. आदिवासी जमिनी कसत आहे. मात्र त्याचे पट्ट्यावर नाव नाही. इतर योजनेत समावेश नाही. राज्यातील वेगवगेळ्या भागात वेगवेगळ्या कारणामुळे फॉर्मर आयडी नाही. महसूल विभागाने एसओपी नाही अशांसाठी १ जानेवारी २०१५ पूर्वी एक जरी पुरावा अधिकार असेल त्याला फॉर्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे. दीपावली निमित्त १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना गिफ्ट सरकारने दिले आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

१ जानेवारी २०१५ पूर्वी कोणत्याही प्रकारच्या जमिनी शेतकरी कसत आहे. ते हस्तलिखित रेकॉर्ड करत आहोत. सरकारची जमीन असली तरीही माझा अधिकार आहे, अशा सर्वांना फॉर्मर आयडी मिळणार आहे. तर पिक पाहणी करण्यासाठी ऑफलाईन पिक पाहणी करण्याचा निर्णय घेतला. १ लाखाहून अधिक शेतकर्‍याच्या रखडलेल्या पीक पाहणी आता सोप्या होतील, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी

राज्यातील सर्व मंत्रांनी त्या त्या भागात शेतकऱ्याच्या घरी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. आम्ही लोहारी सांगवा गावात मुक्कामी जात आहोत. अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प उद्या मोठी सुरू करून भेट देणार आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या घरी राहणार त्यामुळे शेतकऱ्यासाठी दिवाळी गोड होणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा आता तालुकास्तरावर राहणार आहे. रुग्णाच्या जिल्हास्तरावर मोठ्या फेरफटका व्हायच्या त्यामुळे तालुकास्तरावर झाले ते चांगलं झालं, असे ते म्हणाले. जळगाव जामनेर येथील जमीन सरकारला मिळावी आणि आमची जमीन रेल्वेला यामुळे मोठा दिलासा दिवाळी निमित्त मिळाला. गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नीची मागणी सरकारने पूर्ण केली, असे ते म्हणाले.

सयाजी शिंदे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

या राज्यात हायड्रो प्रकल्प वरदान असतो. यामुळे आज स्वस्त वीज मिळते. हायड्रो प्रकल्पामुळे कधीच पर्यावरणाचे ऱ्हास होत नाही. स्वस्त वीज मिळते. सयाजी शिंदे यांचे काय म्हणणे ते आम्ही एकूण किती झाडे लावायच त्यासाठी आम्ही जमीन देऊ. झाड तोडणी योग्य नाही मात्र हायड्रो प्रकल्प परत जाणे देखील योग्य नाही. त्यामुळे दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल आणि दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आंदोलनासंदर्भात दिली.

Follow Us
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई