धारावी पुनर्विकासाची सर्वेक्षणाची मुदत संपली, तरीही स्थानिकांना सामील होण्याची संधी

धारावीतील रहिवाशांचा पुनर्विकास केला जात आहे. येथील रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तरीही आताही ज्यांना यात सामील व्हायचे आहे त्यांच्यासाठीही सोय करण्यात आली आहे.

धारावी पुनर्विकासाची सर्वेक्षणाची मुदत संपली, तरीही स्थानिकांना सामील होण्याची संधी
| Updated on: Aug 12, 2025 | 8:19 PM

धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. यासाठी येथील घरांचे आणि कागदपत्रांचे सर्वेक्षण सुरु होते. त्यातील घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या (डोअर -टू -डोअर) सर्वेक्षणाचा आजचा (12 ऑगस्ट 2025) अखेरचा दिवस होता. डोअर टू डोअर सर्वेक्षण 12 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती जुलै महिन्यातच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वतीने देण्यात आली होती. पोस्टर्स आणि प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वेक्षणाच्या अंतिम मुदतीबाबत स्थानिकांना अवगत करण्यात आले होते. तरीही स्थानिकांना यात सामील होण्याची संधी आहे कशी ते वाचा…

धारावी सर्वेक्षणाच्या अंतिम मुदतीबाबत अद्ययावत माहिती जारी करण्यात आली आहे. धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या (डोअर -टू -डोअर) सर्वेक्षणाचा आजचा (12 ऑगस्ट 2025) अंतिम दिवस होता. हे घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण 12 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्यावतीने (डीआरपी) जुलै महिन्यातच जाहीर केले होते. सर्वेक्षणाच्या अंतिम मुदतीबाबत पोस्टर्स आणि प्रसारमाध्यमांद्वारे स्थानिकांना अवगत करण्यात आले होते.

आता ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षणाची मुदत संपली असली. तरी स्थानिकांना अद्यापही पुनर्विकासात सामील होण्याची संधी उपलब्ध आहे.सर्वेक्षण यादीत स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी स्थानिकांना डीआरपी हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल अथवा आवश्यक कागदपत्रांसह धारावीतील डीआरपी/एनएमडीपीएल कार्यालयाला भेट देता येणार आहे. धारावीतील ज्या ठिकाणी पूर्वी ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशा ठिकाणी नव्याने ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण होणार नसल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे.

विनंतीचा अर्ज दाखल करावा लागेल

सर्वेक्षणात सहभागी होण्याची संधी गमावलेल्या स्थानिकांबाबत पुनर्विचार जरूर करण्यात येईल. मात्र, त्यासाठी परिशिष्ट 2 प्रसिद्ध झाल्यानंतर सदनिकाधारकाला (सर्वेक्षणात सामील करून घेण्याच्या) विनंतीचा अर्ज दाखल करावा लागेल. धारावी पुनर्विकास प्रकल्पात ‘प्रत्येकाला घर’ हे धोरण राबविले जाणार असून हक्काच्या घरासोबतच स्थानिकांना रोजगाराची हमी देण्यासाठी डीआरपी कटीबद्ध आहे.

87,500 हून अधिक सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण

आतापर्यंत 87,500 हून अधिक सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 1 लाखांहून अधिक सदनिकांवर सर्वेक्षण क्रमांक टाकण्यात आला आहे. कोणत्याही कारणाने अद्याप सर्वेक्षणात सहभागी न होऊ शकलेल्या धारावीकरांनी त्यांच्या सदनिकेवर क्रमांक टाकण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी त्वरित पुढाकर घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना पुनर्विकासाचा लाभ घेता येईल.