LIVE : धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, मृतांचा आकडा 12 वर

शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला आहे.

, LIVE :  धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, मृतांचा आकडा 12 वर

धुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढताच आहे. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या स्फोटात आधी 7 नंतर 10 जणांचा मृत्यू झाला होता. दुपारी सव्वा एकच्या सुमारास मृतांचा आकडा 12 वर पोहोचला.  या स्फोटात 40 जण जखमी आहेत.  स्फोटानंतर भीषण आग लागल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृतांमध्ये 9 महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश असल्याने, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 LIVE UPDATE

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर


शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी केमिकल फॅक्टरीत (Dhule chemical factory blast) आज सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केलं.  सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हा स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन, पोलिसांना तातडीने माहिती दिली. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे जाण्यापासून नागरिकांना रोखलं आहे. केवळ बचाव पथकांनाच जाऊ दिलं जात आहे.

हा स्फोट नेमका कसा झाला, त्याचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो लांबपर्यंत ऐकायला गेला. या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला. या कंपनीत नेमके किती कामगार होते याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *