Gold Silver Rate Today 11 May 2024 : ग्राहकांच्या तोंडचं पळालं पाणी; आकाशाला भिडले सोने आणि चांदी

Gold Silver Rate Today 11 May 2024 : अक्षय मुहूर्त साधताना ग्राहकांचा खिसा मात्र खाली झाला. सोने आणि चांदीने तुफान भरारी घेतली. या मुहूर्तावर काहीतरी किडूकमिडूक करण्याची प्रत्येकाची धडपड असते. काहींना हा मोह आवरावा लागला.

Gold Silver Rate Today 11 May 2024 : ग्राहकांच्या तोंडचं पळालं पाणी; आकाशाला भिडले सोने आणि चांदी
सोने-चांदीची 'अक्षय' भरारी
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 8:46 AM

Akshaya Tritiya 2024 अनेकांसाठी लकी ठरली. तर काहींच्या तोंडचं पाणी पळालं. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस सोने-चांदी वधारले. त्यानंतर दोन दिवस दोन्ही मौल्यवान धातूत शांतीपर्व होते. किंमती कमी झाल्याने ग्राहकांनी सराफा बाजाराचा धावा केला. 10 मे रोजी अक्षय तृतीया होती. या दिवशी बेशकिंमती धातूंनी कहर केला. दोन्ही धातूंनी किंमतीत हनुमान उडी घेतली. या स्वयंसिद्ध मुहूर्तावर या धातूंनी ग्राहकांचा खिसा कापला. काय आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 11 May 2024 )

सोन्याचा कहर

या आठवड्यात सोने सुरुवातीलाच महागले. 6 मे रोजी मौल्यवान धातू 200 रुपयांनी वधारला. तर 7 मे रोजी 330 रुपयांनी किंमत वाढली. 8 आणि 9 मे रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली. 10 मे रोजी सोन्याने 1530 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने वचपा काढला

17 एप्रिलपासून चांदीने मोठी उसळी घेतली नव्हती. या आठवड्यात चांदीने ही सर्व कसर भरुन काढली. या आठवड्यात चांदी 4700 रुपयांनी महागली. 6 आणि 7 मे रोजी रोजी चांदी प्रत्येकी हजाराने महागली. 8 मे रोजी किंमती स्थिर होत्या. 9 मे रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली. तर अक्षय तृतीयेला 10 मे रोजी चांदीने 2500 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने उंच भरारी घेतली. 24 कॅरेट सोने 73,008 रुपये, 23 कॅरेट 72,716 रुपये, 22 कॅरेट सोने 66,875 रुपये झाले. 18 कॅरेट 54,756 रुपये, 14 कॅरेट सोने 42,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 84,215 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.