लाल मिरचीचा ठसका उतरला, स्वस्ताईने वाढला गोडवा, गृहिणींकडून वर्षभरासाठी मोठी खरेदी

Red chilies Market Rate down : लाल मिरची गेल्या महिन्यात महागली होती. किंमती अजून वाढण्याची शक्यता होती. पण मिरचीने ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना सुखद धक्का दिला. वर्षभराच्या तिखटासाठी त्यांना आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही.

लाल मिरचीचा ठसका उतरला, स्वस्ताईने वाढला गोडवा, गृहिणींकडून वर्षभरासाठी मोठी खरेदी
लाल मिरचीचा तोरा उतरला
Updated on: Feb 12, 2025 | 12:09 PM

लाल मिरच्यांनी सध्या मसाल्यातील गोडवा वाढवला आहे. लाल मिरचेच भाव घसरल्याने शेतकरी, व्यापारी यांना फटका बसला असला तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक महिन्यापूर्वी लाल मिरची भाव खाऊन गेली. मिरची महागल्याने वर्षभराच्या तिखटासाठी खिशावर ताण येणार असा अंदाज लावण्यात येत होता. पण मिरचीने ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना सुखद धक्का दिला. वर्षभराच्या तिखटासाठी त्यांना आता अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही.

आवक वाढल्याने भाव कोसळला

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरच्यांची आवक वाढली आहे शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात यंदा मिरचीची लागवड झाल्याने आवक वाढल्याने मिरचीचे भाव पडले आहेत. मिरचीला दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपये पर्यंत भाव मिळत आहे.

आता अजून मिरचीची आवक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त आहे. त्यामुळे भाव अजून घसरण्याची शक्यता आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चपाटा काश्मिरी गावराणी लाल मिरची विक्रीला येते. चपाटा काश्मिरी गावरान मिरचीची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने मिरचीला कमी दर मिळत आहे. शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. गृहिणींनी जादा दर द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

भाजीपाल्याला मातीमोल भाव

सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ आता भाजीपाला देखील मातीमोल भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला 5 रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी निराश झाला आहे. त्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्याची चिंता वाढली आहे. 25 किलोच्या टोमॅट कॅरेटची किंमत केवळ 100 रुपयावर आली आहे. गाजर 14 रुपये किलो,तर पालक फक्त 6 रुपये किलोवर विक्री होत आहे. कोथिंबीर पंधरा रुपये किलोवर तर गोबीचे 8 रुपये किलोपर्यंत भाव घसरले..वाटाणा 16 रुपये किलोवर विक्री होत आहे

संकेश्वरी गेली भाव खाऊन

एकीकटे चपाटा आणि इतर मिरच्यांचे भाव कोसळले असले तरी नांदेड जिल्ह्यातील संकेश्वरी मिरची भाव खाऊन गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीत या संकेश्वरी मिरचीचे अडत व्यापारी, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संकेश्वरी मिरचीला किलोमागे 800 रुपये दर मिळाला आहे. मुदखेड तालुक्यातील रोहा-पिंपळगाव या परिसरात या मिरचीचे उत्पादन घेण्यात येते.