राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा; सुषमा अंधारे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

गजानन उमाटे

गजानन उमाटे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 7:04 PM

पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप असा प्रयत्न करत आहे. यापेक्षा राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत वेगळं काही असेल, अस मला वाटत नाही, असंही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं.

राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा; सुषमा अंधारे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
सुषमा अंधारे
Image Credit source: tv9

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं त्यांनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची मागणी लावून धरली. आता राज्यपाल स्वईच्छेने राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यपाल हे जणूकाही हस्तक म्हणून वागत आहेत. असं राज्यपाल कोश्ययारी यांचं वागणं भाजपच्या अंगाशी येताना दिसत आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या अशा वागण्याची गच्छंती करायची आहे. पण, असं करताना आपला पक्ष कुठंही डॅमेज होणार नाही, याची काळजी भाजप घेताना दिसून येत आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप असा प्रयत्न करत आहे. यापेक्षा राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत वेगळं काही असेल, अस मला वाटत नाही, असंही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं.

पक्षनेतृत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार

वंचित आघाडी आणि शिवसेनेची युती झाली. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, सगळ्या शक्यता पाहून पक्ष नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. सगळ्या बाजूंचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. पक्षनेतृत्वाचा आदेश आम्ही शिवसैनिकांसाठी आहे. त्यामुळं पक्षाची ही भूमिका आम्ही पुढं नेणार आहोत.

याचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल

चांगलं पर्व सुरू झालं. जेपींची चळवळ कोण्या एका काळात सुरू झाली होती. अशीच चळवळ भाजपच्या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्रचं नव्हे तर भारतभर हे चित्र दिसेल. येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध विविध पक्षांची मोर्चेबांधणी होणार आहे. याचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं असेल, असा विश्वासही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

राज्यपाल कोश्यारी यांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. जीवनाचा उत्तरार्ध चिंतन आणि मनन यात घालविण्याचा संकल्प त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडं व्यक्त केला. यासंदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून कोश्यारी यांनी माहिती दिली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI