Disha Salian Case : सतीश सालियन यांची नोटीस स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या भावाची पहिली प्रतिक्रिया

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सतीश सालियन आज मातोश्रीवर नोटीस घेऊन गेले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे.

Disha Salian Case : सतीश सालियन यांची नोटीस स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या भावाची पहिली प्रतिक्रिया
Disha Salian-Aaditya Thackeray
| Updated on: Sep 19, 2026 | 5:09 PM

दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सतीश सालियन आज मातोश्रीवर नोटीस घेऊन गेले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात 500 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. सतीश सालियन यांच्यासोबत त्यांचे वकिल होते. यावेळी मातोश्रीच्या परिसरात शिवसैनिक सुद्धा जमले होते. वातावरण तणावपूर्ण होतं. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारल्यानंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते आदित्य ठाकरेंचे नात्याने भाऊ लागतात. “माझं म्हणणं हे काही आज नाही. गेल्या पाच-सहा वर्षात एकदा नाही अनेकदा मिडियात सांगितलय की, आदित्य ठाकरे हे ना सुशांत सिंहला ओळखत होते, ना दिशा सालियानला ओळखत होते. अनेकदा वारंवार हे सांगितलय. आता ते मीडियामध्ये प्रसिद्ध झालेतना बापट त्यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास घटम चिंध्यात..काय ते अशा प्रकारचे प्रयत्न आहेत” असं वरुण सरदेसाई म्हणाले.

“हे प्रयत्न मागच्या पाच-सहावर्षांपासून वारंवार करण्यात आले. हे प्रयत्नआधी सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत करण्यात आले. त्याची सीबीआय चौकशी झाली. त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला. कोणी-कोणी आरोप केले, मीडियावाले, भाजपवाले होते. यात आरोपाचा एकही पुरावा कोणी देऊ शकला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी मीडियासमोर बडबड करायची. पुरावे कसलेच नाहीत” अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली. “दिशा सालियन मृत्यू प्रकरण 2020 चं होतं. तत्कालिन महाविकास आघाडी सरकार होतं. तेव्हा ADR सादर केला. चौकशी झाली. त्यानंतर 2022 साली सरकार बदललं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले. 2022 साली परत एकदा या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली” असं वरुण सरदेसाई म्हणाले.

तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या असं सांगितलं

“2022 साली घोषणा झाली. 2023 मध्ये एसआयटीची स्थापना झाली. 2023 पासून आतापर्यंत 2026 पर्यंत परत एकदा याच प्रकरणाची एसआयटी तपासणी केली. ही एसआयटी कधी स्थापन झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. म्हणजे यांच्याच सरकारच्या कार्यकाळात झाली. त्या एसआयटीने ज्या-ज्या लोकांनी आरोप केले, त्या सर्वांना बोलावलं. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या असं सांगितलं. मग, 14 जून 2026 रोजी याच SIT ने या प्रकरणात कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलय की, पहिल्या सरकारने जी तपासणी केली ती योग्य होती. त्यात एकही तफावत नव्हती” असं वरुण सरदेसाई म्हणाले.

“आता सतीश सालियन काय म्हणतायत,वडिलांना संशय आहे. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आमचं स्टेटमेंट घेतलं नाही असं ते म्हणतायत. पण त्यांचं स्टेटमेंट अनेकदा रेकॉर्ड करण्यात आलं” त्यासाठी वरुण सरदेसाई यांनी आधीच्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us