Sanjay Raut : दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर येऊन नोटिस दिल्यानंतर त्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, ‘तिला असा बाप मिळाला’

Sanjay Raut : "दुष्काळाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला असता तर एव्हाना दुष्काळ जाहीर केला असता. 800 पेक्षा जास्त गावं पाण्याशिवाय तडफडत आहेत. सरकारने फडणवीसांनी विशेष अधिवेशन बोलवून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते समजून घेतलं पाहिजे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर येऊन नोटिस दिल्यानंतर त्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तिला असा बाप मिळाला
Disha Salian Case
| Updated on: Sep 20, 2026 | 10:44 AM

दिशा सालियान प्रकरणात काल तिचे वडिल सतीश सालियन आणि वकिल निलेश ओझा यांनी मातोश्रीवर जाऊन नोटिस दिली. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. त्यावर आज संजय राऊत व्यक्त झाले. “नौटंकी आहे सगळी, ज्यांची मुलगी वारली आहे, त्याचं दु:ख आम्हाला सर्वांना आहे. तिच्या वडिलांनी अशा प्रकारे येऊन जाहीर तमाशा करावा हे त्या मुलीचं दुर्देव आहे. तिला असा बाप मिळाला. त्याला दु:ख म्हणत नाही. त्याला कोणीतरी वकिल सापडला आहे. त्याच्याविषयी काय बोलणार, सीबीआय तपास करतय त्यांना करु द्या. कोर्टाने काही सूचना केल्या आहेत. त्याचं पालन होऊ द्या” असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताय. हे घाणेरडं आहे. सहावर्षांपूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांनी दु:ख, हळहळ व्यक्त केली. काल आयआयटीमध्ये एका मुलाने जीवन संपवलं. आम्ही दु:खी आहोत, महाराष्ट्राला संवेदना आहे. त्याच्या आई-वडिलांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे. तीच गोष्ट या मुलींच्या बाबतीत घडली आहे. तुम्ही मातोश्रीवर येऊन तमाशे करता, तुमच्यामागे कोण आहे, हे आम्हाला माहित नाही का?. काही बेवडे, काही उरबडवे आणि त्यांना नियंत्रित करणारं नेपाळी कनेक्शन यामागे आहे यातून हे सर्व घडतय” असं संजय राऊत म्हणाले.

अमेरिकेच्या दबावाखाली घेतलेला हा निर्णय

“भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांशी माझी चर्चा झाली. या सापळ्यामागचं रहस्य कळायला तयार नाही. यातून फायदा अमेरिकेचा ट्रम्पचा होतोय. ज्या कंपन्यांकडे हे पैसे जाणार आहेत, त्या कंपन्यांशी भारतीय नेत्यांचे, त्यांच्या मुलांबाळाचे काही संबंध आहेत का, याचा शोध घेण महत्वाच आहे. त्याशिवाय इतका मोठा निर्णय ज्यामुळे भारताची जनता, त्या जनतेच्या खिशातली पाकिटमारी होऊन जनता नाराज होईल. पण भाजप सरकारला मध्यमवर्गीय जनतेची कधी फिकिर नसते. पण तो व्यापाऱ्याचा पक्ष आहे, व्यापारी चालवतात. पण आता व्यापाऱ्यांनीच बंड केलं आहे. मी आधी सांगितलं की, अमेरिकेच्या दबावाखाली घेतलेला हा निर्णय आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “मुलं रस्त्यावर आहेत, नोकऱ्यांसाठी, जीडीपी ग्रोथ कशाला म्हणतात, या सरकाराने विकासाची नवीन व्याख्या केली असेल तर सांगावी” असं राऊत म्हणाले.

दुष्काळाच्या बैठकीत खासदारांच्या काजू-बदाम खाण्यावर काय म्हणाले?

खासदार बंडू जाधव यांचा काल दुष्काळाच्या बैठकीतला काजू-बदामा खाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर “बंडू जाधव यांनी महान कार्यासाठी पक्ष सोडला आहे. संवेदना त्यांच्या जागा झाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला. दुष्काळाच्या राजकीय चर्चेमध्ये काजू-बदाम खाता. बाहेर शेतकरी दुष्काळ जाहीर करा म्हणून रडतोय आणि तुम्ही काजू-बदाम खाताय. ज्यांनी टेबलावर काजू-बदाम ठेवले ते पहिले गुन्हेगार आहेत, ज्यांनी ते बकाणे तोंडात भरले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं” असं राऊत म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us