पत्रिकेत मेटेंचं नाव का नाही, 'शिवसंग्राम'च्या गुंडाची डॉक्टरला मारहाण

बीड : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यातील मतभेद जगजाहीर असले, तरी याचं लोण आता थेट कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं आहे. एका खासगी रुग्णालयातच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आमदार विनायक मेटे यांचे नाव न टाकल्याने शिवसंग्रामच्या गुंड कार्यकर्त्याचा संताप शिगेला पोहचला आणि या गुंड कार्यकर्त्याने थेट डॉक्टरलाच अमानुष मारहाण केली. मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली …

पत्रिकेत मेटेंचं नाव का नाही, 'शिवसंग्राम'च्या गुंडाची डॉक्टरला मारहाण

बीड : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यातील मतभेद जगजाहीर असले, तरी याचं लोण आता थेट कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं आहे. एका खासगी रुग्णालयातच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आमदार विनायक मेटे यांचे नाव न टाकल्याने शिवसंग्रामच्या गुंड कार्यकर्त्याचा संताप शिगेला पोहचला आणि या गुंड कार्यकर्त्याने थेट डॉक्टरलाच अमानुष मारहाण केली. मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली असून शिवसंग्रामच्या त्या गुंड कार्यकर्त्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकी काय घटना आहे?

डॉ. सोमनाथ पाखरे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर हे येणार होते. मात्र त्या पत्रिकेवर विनायक मेटे यांचं नाव का टाकलं नाही, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या राहुल आघाव या शिवसंग्रामच्या गुंड कार्यकर्त्याने डॉ. सोमनाथ पाखरे यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये तब्बल दहा मिनिट हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता डॉक्टरला मारहाण करताना पाहायला मिळतोय.

दरम्यान, या प्रकारानंतर डॉक्टर पाखरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन शिवसंग्रामचा कार्यकर्ता राहुल आघाव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी राहुल आघाव फारर झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *