आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली? नारायण राणेंचा सवाल

| Updated on: Dec 28, 2021 | 1:38 PM

नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्याच्या प्रकरणावर नारायण राणे यांनी आणखी एक सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचा आवाज काय मांजरासारखा आहे का, त्यांना एवढा राग का यावा?

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली? नारायण राणेंचा सवाल
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबईः आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) आवाज मांजरीसारखा आहे का, शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा  सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मांजरीसारख्या आवाजावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे भडकले. तसेच शिवसेना नितेश राणेंना अटक करण्यासाठी सूडभावनेने वागत असल्याचा आरोपही नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढतं? ज्यामुळे चिडले. आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

पोलीस एवढं सूडाने का वागतायत?

दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘ पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं? एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी. नाव गोवायचं आणि 307 लावायचं, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचा असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

इतर बातम्या-

माझ्या बायकोचा नवरा! पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीचा जीव प्रियकरात अडकला, नवऱ्याने काय केलं बघा

Disha Patani | वर्षा अखेरीसही दिशा पाटनीने दाखवला बोल्ड अंदाज, बिकिनी फोटोची सोशल मीडियावर चर्चा!