AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या बायकोचा नवरा! पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीचा जीव प्रियकरात अडकला, नवऱ्याने काय केलं बघा

नवऱ्याने सर्वांच्या समक्ष आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. आठवड्याभरापूर्वी झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

माझ्या बायकोचा नवरा! पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीचा जीव प्रियकरात अडकला, नवऱ्याने काय केलं बघा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 1:18 PM
Share

पाटणा : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात वनराज (अजय देवगण) नंदिनीचं (ऐश्वर्या राय) लग्न तिचा प्रियकर समीर (सलमान खान) सोबत लावून दिल्याचं आपण पाहिलं आहे. या सिनेमाची कथा मोठ्या पडद्यावर अनेकांना भावली, मात्र खऱ्या आयुष्यात असं घडल्याचं कोणी सांगितलं, तर तुम्ही म्हणाल, ‘हॅ! असं कुठे असतं का?’ परंतु चंदेरी पडद्यावर दिसलेली ही कथा तब्बल 22 वर्षांनी प्रत्यक्षात घडल्याचं पाहायला मिळत आहे.

बिहारमधील जमुईमध्ये (Jamui) प्रेम, समर्पण आणि त्यागाची ही अनोखी कहाणी समोर आली आहे. नवऱ्याने सर्वांच्या समक्ष आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. आठवड्याभरापूर्वी झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

काय आहे ही स्टोरी?

व्हायरल व्हिडीओमधील माहितीनुसार पतीने आपल्या पत्नीचा विवाह बंगळुरुत लावून दिला. पती विकास कुमार हा मूळ बिहारमधील जमुईतील बलथर गावातील रहिवासी आहे. तो बंगळुरुत नोकरी करतो. याआधी त्याचा एक विवाह झाला होता. मात्र पहिल्या पत्नीचं अकस्मात निधन झालं. दोन वर्षांपूर्वी शिवानी नावाच्या महिलेशी त्याने लगीनगाठ बांधली. दुसऱ्या लग्नानंतर तो पत्नीसह बंगळुरुत स्थायिक झाला होता.

बायकोच्या सामानात परपुरुषाचा फोटो

एके दिवशी विकासला शिवानीच्या सामानात एका तरुणाचा फोटो सापडला. विकासने शिवानीला त्याच्याबद्दल विचारलं, मात्र ती काहीच सांगायला तयार नव्हती. अखेर विकासने तिच्याकडे खोदून चौकशी केली, तेव्हा तिने जे सांगितलं, ते ऐकून विकासच्या पायाखालची जमीनच सरकली. तो फोटो शिवानीचा प्रियकर सचिनचा होता.

लपूनछपून भेटीगाठी

या प्रेम कहाणीत ट्विस्ट येण्याला कारण ठरलं सचिनची बंगळुरुतील एन्ट्री. विकास आपल्या प्रेयसीशी लग्न करुन बंगळुरु गेल्याचं समजताच सचिननेही शक्कल लढवली. काकाकडे नोकरी करण्याच्या बहाण्याने तो बंगळुरुला गेला. त्यानंतर तो लपूनछपून प्रेयसीला भेटू लागला. ही गोष्ट समजल्यावर विकासने शिवानीस आडकाठी केली. तिची समजूत घालण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र नवऱ्याच्या उपदेशांकडे कानाडोळा करत शिवानी प्रियकराला भेटतच राहिली.

अखेर विकासचा ‘वनराज’ झाला

पत्नी हट्टाला पेटल्याचं पाहून विकासनेही दोन पावलं मागे जाण्याचं ठरवलं. तुझं लग्न मी सचिनसोबत लावून दिलं, तर तुला चालेला का, असं त्याने विचारलं. त्यावर तिनेही होकार दिला. अखेर विकासने सचिनला बंगळुरुत बोलावलं आणि दोघांचा विवाह लावून दिला. विशेष म्हणजे स्वतःच त्याने दोघांचा व्हिडीओ शूटही केला. विकासने मोठ्या मनाने बायकोचंच लग्न लावून दिल्यानं कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

संबंधित बातम्या :

संसार उमलण्याआधीच गालबोट, सासरी जाताना गळ्यात मांजा अडकला, नवविवाहित तरुणाचा मृत्यू

Nashik | बायकोने फारकत शब्द उच्चारताच नवऱ्याची दुथडी भरलेल्या गंगेत उडी…

महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.