
Dombivli Assembly Constituency : २००८ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. २००९ पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण येथून प्रतिनिधित्व करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघावर आरएसएसची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपच्या जवळचा मतदार या मतदारसंघात भाजपला मतदान करतो. या मतदारसंघात कोकणी लोकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर गुजरात, मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकं आहेत. हे देखील भाजपला मतदान करतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात अनेक जण उभे होते. पण २०१९ मध्येही भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे आणि आता चौथ्यांदा ते...