नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत वाढ; जामीन रद्द झाल्यानंतर आता पोलिसांनी दिला मोठा हादरा

ramesh mhatre : नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत दिवसेंदिवस होताना पाहायला मिळत आहे. काल कोर्टाने जामीन रद्द केला. आता पोलिसांनी सरेंडर होण्यासाठी नोटीस धाडली आहे.

नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत वाढ; जामीन रद्द झाल्यानंतर आता पोलिसांनी दिला मोठा हादरा
| Updated on: Jul 19, 2026 | 1:45 PM

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. हायकोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर आता रमेश म्हात्रे यांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याची नोटीस पोलिसांनी धाडली आहे. हायकोर्टाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर विष्णुनगर पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आहेत. त्यांनाही जामीन रद्द झाल्याची नोटीस बजावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे वैद्यकीय जामीनावर होते. मारहाणीनंतर पुढील काही दिवसांत त्यांना जामीन मिळाला होता. राज्यभरातील डॉक्टरांनी या मारहाणीच्या निषेध म्हणून 20 जुलै 2026 रोजी 24 तास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांची विशेष सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने महानगर दंडधिाकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचे म्हणत ताशेरे मारले. तसेच रमेश म्हात्रेंच्या जामिनावरही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द करत पोलिसांना 5 वाजेपर्यंत शरण होण्याचे आदेश दिले.

…अन् रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द

पोलिसांच्या नोटिशीनंतर रमेश म्हात्रे स्वतःहून हजर होतात की पोलिसांना शोधमोहीम राबवावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. ६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली होती. ८ जुलैला रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती.
१४ जुलैला कल्याण सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र डॉक्टर संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काल 18 जुलैला उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत रमेश म्हात्रे आणि इतर तिघांचा जामीन रद्द केला होता.

पाचवी आरोपी अटकेत

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणाला नवे वळण लागलंय. उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांची धडक कारवाई केली. आता या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे हिला अटक करण्यात आली आहे. ती उपचार घेत असलेल्या प्रियांका उधमाळेची आई आहे. साधनाला काल रात्री पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांची दिली. या मारहाणीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्याने तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

Follow Us