कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन, मात्र गुदमरुनच मृत्यू, डॉ. शीतल आमटे आत्महत्याप्रकरणात नवनवे खुलासे

| Updated on: Dec 30, 2020 | 6:33 PM

डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. (Dr. Sheetal Amte Suicide Case Update)

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन, मात्र गुदमरुनच मृत्यू, डॉ. शीतल आमटे आत्महत्याप्रकरणात नवनवे खुलासे
Dr. Sheetal Amte
Follow us on

चंद्रपूर : तब्बल महिनाभरानंतरही महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत पोलीस तपासात अल्प प्रगती दिसत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड करण्यात आला. (Dr. Sheetal Amte Suicide Case Update)

पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. मात्र यात पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा नवी अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची महत्वपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा करु शकणारे त्यांचे टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अ‍ॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत. शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते, असे यापूर्वी समोर आले होते.

दरम्यान अद्याप टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहे. त्याशिवाय व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत आहेत. विविध अहवाल अद्याप प्रतिक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Dr. Sheetal Amte Suicide Case Update)

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कोठून मिळवले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. (Dr. Sheetal Amte Suicide Case Update)

संबंधित बातम्या :

आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?