महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल! चेन्नीथला यांना हटवून या नेत्याकडे प्रभारीपद
डॅा. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या जागी प्रसाद यांची निवड सिरीवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे नेते झारखंडचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे

Maharashtra Congress : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. सध्या इथं महायुती सत्तेत असली तरीही विरोधी बाकावर असणाऱ्या पक्षांनाही तेवढंच महत्त्व आहे. काँग्रेस हा राज्यातला एक महत्त्वाचा विरोधी पक्ष आहे. आगामी निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी केली आहे. तरुणाईला तसेच इतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे नुकतेच पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता याच काँग्रसेमध्ये थेट दिल्लीवरून आदेश आल्यानंतर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी नव्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नेत्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी
समोर आलेल्या माहितीनुसार डॅा. सिरिवेल्ला प्रसाद हे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी असतील. रमेश चेन्नीथला यांच्या जागी प्रसाद यांची निवड करण्यात आली. सिरीवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. म्हणजेच त्यांच्याकडे प्रभारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. आता ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमके काय काय बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.