“दुष्काळाच्या संकटात मोठी संधी दडलीय” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप 2027’ ची घोषणा
Water Cup 2027 : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्य सरकार आणि पानी फाउंडेशनचा 'संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप २०२७' उपक्रम जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला आहे.

Water Cup 2027 : राज्यातील 310 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून. राज्यात आताच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान यांच्या पुढाकाराने ‘संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप 2027’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध करण्याच्या सामूहिक ध्येयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. राज्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने ‘संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप 2027’ हा उपक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध गावांना जलसंधारणाच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे. अभिनेता आमिर खान यांचाही या उपक्रमाशी सहभाग आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय शोधणं, पावसाचं पाणी अडवणं, पाण्याची साठवण क्षमता वाढवणं आणि भूजल पातळीत सुधारणा करणं यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारणाची कामं लोकसहभागातून करण्यावर भर दिला जाणार आहे. पाण्याचं योग्य नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचं संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
‘वॉटर कप 2027’ उपक्रमाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आपल्याला यामध्ये तीन गोष्टी करण्याची फार गरज आहे. एक कॉन्व्हर्जन आहे, दुसरं कम्यूनिकेशन आणि तिसरं कॉर्डिनेशन… या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. तालुक्याच्या स्तरावर प्रांतअधिकारी असेल आणि त्याच्याही अध्यक्षतेखीली समिती स्थापन केली जाणार आहे. वेळ कमी आहे आणि आता काम सुरु केल्यानंतर निश्चित कालावधीमध्ये काम पूर्ण करायचं आहे. पावसाळ्याच्या पूर्वी ही कामं पू्र्ण ही कामं करणं अत्यंत गरजेचं आहे. मागही काळामध्ये गावमुक्त धरण, गावमुक्त शिवार असा योजना राबवण्यात आलेल्या. या योजने अंतर्गत अप्रतिम काम झालेलं आहे.’
पुढे फडणवीस म्हणाले, ‘ग्रमस्त काम करण्यासाठी पुढे असतात, पण आता यंत्रणेला गावाच्या पुढे राहायचं आहे. प्रत्येक गोष्टींची अधिच तयारी झाली पाहिजे. मागणी व्हायच्या आधी आपण तयार आहोत, हे जर समाजाला दाखवलं, तर समाज अधिक उत्साहाने काम करेल. त्यामुळे एका मोठ्या भीषण दुष्काळाचा सामना करत असताना आपल्याला एक मोठी संधी दिसत आहे.’, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.