राज्यात दुष्काळ जाहीर, मात्र शेतकऱ्यांचा संताप, थेट रस्त्यावर उतरले अन्..
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र तरी देखील शेतकऱ्यांमध्ये संताप दिसून येत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळत आहे.

यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशावरच ऐल निनोचं मोठं संकट आहे. एल निनोचा परिणाम म्हणून राज्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे दोन आठवडे राज्यात पाऊसच न झाल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात आज दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.
मात्र एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी देखील दुसरीकडे अजूनही शेतकरी नाराजच आहेत. आज अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी येथे बस स्थानकासमोर शेतकऱ्यांच्या वतीने सरकारच्या दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीसोबत दुष्काळाचा शासन निर्णय जाळला आहे. सरसकट सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, याचाच अर्थ जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शासनस्थरावर विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, जमीन महुसात सूट, विद्यार्थ्यांना फी माफी, कृषी वीजबिलामध्ये सूट, धान्याचं वाटप अशा विविध उपाय योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान आता दयेत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देखील सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.