AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपक्ष सचिन सानपांना शिंदेसेनेचा पाठिंबा! एकनाथ शिंदेंची घोषणा; महायुतीच्या रणनीतीवर काय सांगितलं?

Shiv Sena Extends Support to Sachin Sanap: शिंदेंच्या शिवसेनेचा सचिन सानपांना पाठिंबा आहे. महायुतीच्या एकजुटीबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलं आहे.

अपक्ष सचिन सानपांना शिंदेसेनेचा पाठिंबा! एकनाथ शिंदेंची घोषणा; महायुतीच्या रणनीतीवर काय सांगितलं?
| Updated on: Oct 15, 2026 | 10:55 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेकडून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच दुष्काळावरही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, दुष्काळाचे संकट मोठे आहे. आम्ही बांधावर जाऊन संवाद साधला आहे. राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर केला आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तसेच आगामी निवडणुकीवर भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, काल 5 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. जेवढी मदत करता येणार तेवढी आपण करणार आहोत. जिथे दुष्काळ आहे तिथे शिवसेनेकडून मदत केली जाणार आहे. हजारो लोकांनी मदतीला पुढे आले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे काम नाही आहे. काही झाले तरी टीका करायच्या. सर्वांवर ते टीकाच करतात. अशा वेळी राजकारण बाजूला ठेऊन टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. निवडणुकीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून आम्ही लढत आहे. काही अपवाद वगळता आम्ही विधानसभेची निवडणूक महायुती म्हणूनच लढत आहोत. मी शिवसेनेकडून सचिन सानपांना पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांनी निर्णय जाहीर केला आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठवाड्यात दुष्काळी भागात मदत रवाना झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी टेम्पोचं उद्घाटन केले आहे. नाना भाणगिरे यांनी नवरात्रीचा खर्च टाळून मदत केली आहे. शिवसैनिकांना आवाहन केलं होतं त्यानुसार मदत केली जात आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक