AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योगपतींच्या लग्नात तुमची मुलं नाचतात, अदानींसोबत शिवाजी पार्कात जेवता, ही कसली डिनर डिप्लोमसी?; एकनाथ शिंदेंचा पलटवार

Shinde vs Thackeray : राज ठाकरे यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये अदानींना देशातील बहुतांशी उद्योग दिल्याचा आरोप केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

उद्योगपतींच्या लग्नात तुमची मुलं नाचतात, अदानींसोबत शिवाजी पार्कात जेवता, ही कसली डिनर डिप्लोमसी?; एकनाथ शिंदेंचा पलटवार
Eknath Shinde vs Raj and Uddhav ThackerayImage Credit source: X
| Updated on: Jan 12, 2026 | 9:47 PM
Share

मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार प्रचार करत आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये अदानींना देशातील बहुतांशी उद्योग दिल्याचा आरोप केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले – शिंदे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले. तुमच्या राज्यात काहीच मिळालं नाही. तुम्ही कधी मागायला गेला नाही. इतका इगो होता. त्याच मोदींवर आता टीका करत आहात. अयोध्येत राम मंदिर बांधलं. 370 कलम रद्द केलं. त्यांना तुम्ही शिव्या देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येत आहे. दावोसला मुख्यमंत्री जाणार आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक येणार आहे.

तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, एकनाथ शिंदेंचा पलटवार

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुंबईची मोकळी मैदाने आणि भुखंड कुणी दिली. या उद्योगपतींशी कुणाकुणाबरोबर संबंध आहे. दीड दोन वर्षापूर्वी उद्योगपती कलानगरला कुणाच्या घरी गेले, बंद दाराआड चर्चा कुणाशी केली. तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही. ही कसली डिनर डिप्लोमसी. कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का. आमच्यावर कसले आरोप करता. यह जनता है सब जानती है. ज्यांची नावे घेता त्यांना जेवायला बोलावता. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात. तुमचे नकाशे पाहून जयंत पाटील कावरे बावरे झाले. आधी काय परिस्थिती होती. आता काय झाली. जब चाहीए हरी पत्ती तब याद आती है उद्योगपती. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आणि मुंबई फर्सट हेच आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...