इकडे आग लावायची का ? तिकडे लावायची ? ठाकरे – शिंदेंच्या चिन्हाबाबत महाजन काय म्हणाले ?

महाजन यांनी दोन्ही गटाला मिळालेल्या चिन्हावरुन सूचक विधान करत जनता कुणाला कौल देते हे महत्वाचे असल्याचं म्हंटले आहे.

इकडे आग लावायची का ? तिकडे लावायची ?  ठाकरे - शिंदेंच्या चिन्हाबाबत महाजन काय म्हणाले ?
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 6:57 PM

चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, नाशिक : शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आता दोन्ही गटाला नवीन नावं आणि चिन्हं देखील मिळाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे नाव तर मशाल हे चिन्हं मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले असून ढाल-तलवार हे चिन्हं मिळाले आहे. एकूणच अंधेरी पूर्व या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळावे याकरिता धाव घेतली होती. त्यावरूनच ठाकरे गटाने देखील यावर हरकत घेत पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळावे यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. एकूणच या वादात निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह हे दोघेही गोठवले आहेत. त्यावरून आता नवीन नाव आणि चिन्ह घेऊन दोन्ही गटाला जनतेच्या दरबारात जावे लागणार आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.

भाजप नेते तथा शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी यावर महत्वाचे विधान केले आहेत.

महाजन यांनी दोन्ही गटाला मिळालेल्या चिन्हावरुन सूचक विधान करत जनता कुणाला कौल देते हे महत्वाचे असल्याचं म्हंटले आहे.

ढाल तलवार हे ऐतिहासिक चिन्ह असून शिंदे गटाला चांगले चिन्ह मिळाल्याचे महाजन यांनी म्हणत ढाल तलवार कामात येते की मशाल कामात येते हे स्पष्ट होईल असेही म्हंटले आहे.

इकडे आग लावायची आहे की तिकडे आग लावायची यापेक्षा जनतेचा कौल महत्वाचा असल्याचे म्हणत ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरुन महाजन यांनी ठाकरे गटाला चिमटा काढला आहे.

याशिवाय दोन्ही गटात जर लढत झाली तर हे सिद्ध होईल की जनतेचा कौल कुणाला आहे असे विधान करून महाजन यांनी सावध भूमिका प्रतिक्रिया दिली आहे.