शिंदेंचा ठाकरेंना नाशिकमध्ये पुन्हा एक धक्का, केली महानगरप्रमुखाची घोषणा…

| Updated on: Sep 20, 2022 | 2:02 PM

नाशिक महानगर प्रमुख पदी प्रवीण तिदमे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांनी स्वतः सोशल मिडियावर शेयर केले आहे.

शिंदेंचा ठाकरेंना नाशिकमध्ये पुन्हा एक धक्का, केली महानगरप्रमुखाची घोषणा...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : शिवसेनेत (Shivsena) पडलेली उभी फुट आता अधिकची मजबूत होऊ लागली आहे. शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शिवसेना कुणाची यावरून टोकाचा संघर्ष सुरू आहे. शिवसेना कुणाची हा वाद आता थेट न्यायालयात जाऊन पोहचला आहे. मात्र, असे असतांना एकनाथ शिंदे यांच्याकडून ठिकठिकाणी पदाधिकारी नेमून पक्षबांधणीचे काम सुरू झाले आहे. नुकतेच नाशिक (Nashik) आणि दिंडोरी मतदार संघाच्या जिल्हाप्रमुखांच्या निवडी करत त्यांना पत्र दिले होते. त्यातच आता नाशिक शहराच्या महानगर प्रमुख या पदाच्या बाबत नियुक्ती पत्र देत घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अशा नियुक्त्या देऊन शिंदे यांनी धक्का तंत्र वापरल्याचे बोलले जात आहे.

नाशिक महानगर प्रमुख पदी प्रवीण तिदमे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांनी सोशल मिडियावर शेयर केले आहे.

तिदमे यांना दिलेले हे पत्र शिवसेना सचिव म्हणून नेमण्यात आलेले संजय मोरे यांच्या सहीचे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नियुक्ती पत्र तिदमे यांना स्वतः दिले असून त्याचेही फोटो तिदमे यांनी सोशल मिडियावर शेयर केले आहे.

ही नियुक्ती करत असतांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती यावेळी दिसून आली आहे.

जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख ही पदे नियुक्ती करत असतांना हेमंत गोडसे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे.

ठाकरेंच्या विश्वासातील असलेल्या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या जवळचे म्हणून माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांची ओळख होती.

तिदमे हे शिवसेनेतील तरुण नगरसेवकांपैकी अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात, नवीन नाशिकमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.